नांदेड दि. १५: गुरू रविदास (चर्मकार) समाज महिला मंडळ नांदेडच्या वतीने रविवार, दि. 21 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता शिवपार्वती मंगल कार्यालय, भावसार चौक, मालेगाव रोड, नांदेड येथे माँ जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांची संयुक्त जयंती तसेच बसपा प्रमुख बहन कु. मायावती यांचा 68 वा जन्मदिवसाचा कार्यक्रम व तिळगुळ समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विचारवंत तथा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कल्पना जमदाडे, उद्घाटक म्हणून उपजिल्हाधिकारी सौ. संतोषी देवकुळे, प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ. उषाताई कांबळे आणि अंनिसचे इंजि. सम्राट हटकर यांची उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमास समाजातील उद्योजक महिला, आंतरजातीय विवाह केलेले जोडपे आणि केवळ मुली असणार्या जोडप्यांचा तसेच देहदान, अवयवदान करणार्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन पाण्याचा दिवा पेटवून करण्यात येईल. याप्रसंगी बहुजन समाजातील महान स्त्रियांना अपेक्षित परिवर्तन झाले काय? आणि महिलांमधील श्रद्धा-अंधश्रद्धा या विषयावर मान्यवर प्रबोधन करणार आहेत. यावेळी लहान बालकांचे नृत्य, वत्कृत्व, चित्र प्रदर्शन व रांगोळी होणार आहे. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्त्या डॉ. संजीवनी शेळके, सौ. अर्चना गायकवाड, सौ. रेखा धनगे, सौ. अनिता देगलूरकर, सौ. गंगाबाई दुधंबे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तरी समाजातील जास्तीत जास्त महिलांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. गंगामणी खंदारे, मीनाक्षी वाघमारे, सुमन टोम्पे, मनीषा कांबळे, मंजुषा बाबरे, कुसुम गायकवाड, रत्नमाला खंदारे, सीमा खंदारे, संगीता जोगदंड, छाया अन्नपूर्णे, विद्या टोम्पे, कलावती आसोरे, मंगला दुधंबे, जयश्री उतकर व समस्त महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड