सातारा दि.२१: बोरगाव पोलीस स्टेशनच्या भागामध्ये महिला व बाल अत्याचाराच्या घटनां मध्ये वाढ झाली आहे. याबाबत पीडित महिला व बालक हे बोरगाव पोलीस स्टेशन मध्ये मदतीची अपेक्षा करून गेल्यावर पोलिसांकडून कसलेच सहकार्य मदत मिळत नाही उलट गुन्हा करणाऱ्यालाच पोलीस पाठीशी घालत आहेत. त्यामुळे बोरगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये महिला व बालके सुरक्षित आहेत काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. पीडित यांच्यासोबत सहकार्य व न्यायाच्या भूमिकेने न वर्तन करता पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे आणि पोलीस कर्मचारी अपमानास्पद वागणूक देत आहेत असा अनुभव पीडित महिला व बालक यांना वारंवार येत आहे. आमच्याकडे बोरगाव पोलीस स्टेशन मध्ये होणार्या अन्यायकारक कार्यपद्धतीला पंच क्रोशितील नागरिक त्रासाला कंटाळून नागरिक पुढे येवून बोलत आहे. त्यामुळे या सांविधानिक पदावर बसुन नागरिकांची सुरक्षा व न्यायाची जबाबदारी पोलीस निरीक्षक पार पाडत नसतील आणि आपला मनमानी कारभार करून पीडित महिला व बालकांना सांविधानिक वागणूक देत असतिल तर अशा अधिकाऱ्याला जनतेचे सेवक म्हणजे घेण्याचा नैतिक अधिकार नाही याउलट अशा अधिकारी यांच्या कारभारामुळे सामान्य नागरिकाला न्याय मिळणार नाही त्यामुळे बोरगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांचे डीमोशन करण्यात यावे या मागणीसाठी आणि पीडित महिला व बालक यांना न्याय मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने गुरुवार दि. 22 फेब्रुवारी 2024 रोजी सातारा जिल्ह्याचे पालक मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या निवास स्थानां बाहेर तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात येणार असल्याचे युवा नेते गणेश वाघमारे वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा व युवा आघाडी जिल्हा महासचिव सायलीताई भोसले यानी सांगितले. याबाबतचे निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल मॅडम यांना निवेदन देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव करडे, सतीश कांबळे, शशिकांत गंगावणे, रविंद्र वायदडे, जिल्हा संघटक श्रावण पुलावळे, जिल्हा सचिव अमोल पाटोळे, तालुका अध्यक्ष दत्तात्रय सावंत, प्रशांत कीर्तीकुडाव, सुदर्शन मोहिते अनिल बडेकर , स्वप्निल दबडे, अमन मुलानी, अक्षय जावळे व पीडित महिला व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड