

हिमायतनगर प्रतिनिधी /-निवडणुका येतात आणि जातात नेता आपल्या यशाचा लंब उंचावतो परंतु कार्यकर्ता हा कार्यकर्ताच राहतो. परंतु संघ विचारधारेच्या मुशीतून वाढलेला नेता कितीहि मोठा झाला तरी तो स्वयंसेवक असतो ही भावना रुजवली जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेने प्रभावित झालेले भाजपा नेते श्रीकांत पाटील यांच्या साधेपणाने बूथ प्रमुखांना भुरळ पडली. मध्यप्रदेशातील कॅबिनेट दर्जाचा नेता आपल्या सोबत रांगेत उभे राहून भोजन घेतो,मांडीला मांडी लावून जेवण करतो आपल्या अडीअडचणी जाणून घेतो आणि रोजगारासाठी वचनबद्ध असल्याचे अभिवचन देतो. या विचारधारामुळे कार्यकर्ते अचंबीत झाले असल्याचे पाहायला मिळाले..
या बाबत सविस्तर वृत्त असे की हिंगोली येथे मध्यप्रदेशाचे उपमुख्यमंत्री जगदीशजी देवरा यांच्या नेतृत्वाखाली बूथ प्रमुखाची बैठक घेण्यात आली होती आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभेतील बूथ प्रमुखांच्या बैठकीत देवरा यांनी निवडणुकीत बूथ प्रमुखांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून पक्षाची विचारधारा, मोदीजींचे विचार सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचत आपल्या बुथवर महायुतीचा उमेदवार कसा प्रभावी ठरेल या दृष्टीने परिश्रम घेत कामाला लागावे असे आवाहन केले. इच्छुक उमेदवारांनी डिजिटल बाजी केली. मात्र मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीशजी देवरा यांच्या भेटीत कार्यकर्ते मात्र श्रीकांत पाटील यांच्या विचारसरणीने प्रभावित झाले. निवडणूक येतात उमेदवार विजयी होतात परंतु कार्यकर्ता जागीच राहतो ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची मनस्थिती असते. परंतु श्रीकांत पाटील यांनी आधी कार्यकर्त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न सोडवायचा असा मनोदय व्यक्त केला. प्रत्येक बूथ प्रमुख आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल यासाठी आपण पुढाकार घेणार सहा विधानसभा क्षेत्रात स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारणार आणि या माध्यमाने कार्यकर्ते सक्षम झाले पाहिजे असे विचार मांडले. काही बूथप्रमुखांनी आपल्याला रोज मजुरी करावी लागते ही रोज मजुरी बुडवने शक्य नसल्यामुळे बैठकीला देखील आले नसल्याचे सांगितले. या बूथ प्रमुखांच्या भावना व्यक्त करताना श्रीकांत पाटील गहिवरले आणि आपले मिशन रोजगार राहील अशी ग्वाही दिली. मध्यप्रदेशातील कॅबिनेट दर्जाचा नेता कुठलाही बडेजावपना न करता कार्यकर्त्यांच्या सोबत रांगेत लागून जेवणाच ताट घेतो. आपल्या घासातला घास देण्याची तयारी दर्शवतो या भावनेमुळे कार्यकर्त्यांना मात्र मोहिनी पडली. असा आपला माणूस लोकसभेत पाठवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा बूथप्रमुखांनी संकल्प घेतला. साहेब लोकसभेचे उमेदवारी तुम्हालाच मिळावी अन तुमच्या सोबत काम करण्याच आम्हाला अहोभाग्य मिळावे अशीही भावना काही बूथ प्रमुखांनी व्यक्त केली.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड