नांदेड दि.१७: : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार बालाजीराव कल्याणकर हे आज १७ मार्च रोजी अर्धापूर तालुक्यातील देगाव कुऱ्हाडा येथे एका लग्न समारंभासाठी आले असता दुपारी त्यांच्या गाडीवर एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत अज्ञातांनी त्यांच्या वाहनावर दगडफेक करून वाहनाच्या काचा फोडल्या आहेत. विशेष म्हणजे काल आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समवेत सर्व लोकप्रतिनिधींचा पोलीस बंदोबस्त काढून घेण्यात आला आहे.आणि आज दुपारीच वाहनाच्या काचा फोडल्याची घटना नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात घडली आहे.
नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार असलेले बालाजीराव कल्याणकर हे अर्धापूर तालुक्यातील देगाव कुऱ्हाडा येथे एका लग्न समारंभासाठी आले असता दुपारी त्यांच्या गाडीवर एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत अज्ञातांनी त्यांच्या वाहनावर दगडफेक करून वाहनाच्या काचा फोडल्या आहेत. ही घटना घडल्यानंतर लग्न सोहळ्याच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती.
सदरिल घटनेत आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या चारचाकी वाहनाच्या पाठीमागचे काच अज्ञानातांनी फोडून टाकल्या आहेत. ही घटना रविवारी दुपारी नांदेड मधील अर्धापूर तालुक्यात एक विवाहसोहळा प्रसंगी घडली आहे. अर्धापूर तालुक्यातील देगाव कुऱ्हाडा येथे एका लग्न समारंभासाठी आमदार बालाजीराव कल्याणकर हे आले होते.ते विवाहसोहळ्याच्या ठिकाणी आपली चारचाकी वाहन उभे केले असता अज्ञातांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत सदरिल वाहनांचे काचा फोडल्या आहेत.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड