नांदेड दि.२०: केद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून निवडणूक घोषित झाल्यापासून निवडणुकांचे निकाल जाहीर होईपर्यंत परवाना दिलेली शस्त्रास्त्रे सार्वत्रिक ठिकाणी बाळगण्यास, वाहून नेण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत जिल्ह्यातील शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती, दंडाधिकारी, शक्तीप्रदान केलेले अधिकारी-कर्मचारी, बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अधिकारी-कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व परवानाधारक व्यक्तींना परवाना दिलेले शस्त्रास्त्रे सार्वत्रिक ठिकाणी वाहून नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्ह्यात हे आदेश 6 जूनपर्यंत लागू राहणार आहेत.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड













