मुंबई दि.२५: आपल्या देशाने प्रजासत्ताक लोकशाही पद्धती स्वीकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीत मतदान करणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते. तर काहीठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की, काही संस्था, आस्थापना भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत, त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित रहावे लागते, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे, असे शासन परिपत्रकात म्हटले आहे.
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांना दिली जाते भरपगारी सुट्टी; संबंधित आस्थापनाने सुट्टी/सवलत न दिल्यास होणार कारवाई
भारत निवडणूक आयोगाने (दि.१६ मार्च) रोजीच्या प्रसिद्धिपत्रकाव्दारे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर निवडणुकीचे मतदान राज्यात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ०७ मे, १३ मे आणि २० मे अशा पाच टप्प्यात होणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी सदरील शासन आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. यामध्ये निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्णदिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहिल.
उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या आणि संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, संबंधिताविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची संबंधित आस्थापनांना दक्षता घ्यावी लागणार आहे, असे शासन परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सदर परिपत्रक भारत निवडणूक आयोगाच्या पत्रास अनुसरुन निर्गमित करण्यात आले आहे. हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाचे कार्यासन अधिकारी शामकांत सुरेश सोनवणे यांनी सदर सुट्टीचे परिपत्रक जारी केले आहे.
मतदानाचे टप्पे / मतदानाचा दिनांक / लोकसभा मतदार संघाचे नाव
पहिला टप्पा: १९ एप्रिल, २०२४
९- रामटेक, १०-नागपूर, ११-भंडारा-गोंदिया, १२- गडचिरोली-चिमूर, १३-चंद्रपूर
दुसरा टप्पा: २६ एप्रिल, २०२४
५-बुलढाणा, ६-अकोला, ७-अमरावती, ८-वर्धा, १४-यवतमाळ-वाशिम, १५-हिंगोली, १६-नांदेड, १७-परभणी
तिसरा टप्पा: ७ मे २०२४
३२-रायगड, ३५-बारामती, ४०-उस्मानाबाद, ४१- लातूर, ४२-सोलापूर, ४३-माढा, ४४-सांगली, ४५-सातारा, ४६-रत्नागिरी-सिंधुदूर्ग, ४७- कोल्हापूर, ४८-हातकणंगले
चौथा टप्पा: १३ मे २०२४
१-नंदुरबार, ३-जळगाव, ४-रावेर, १८-जालना, १९- औरंगाबाद, ३३-मावळ, ३४-पूणे, ३६-शिरूर, ३७- अहमदनगर, ३८-शिर्डी, ३९-बीड
पाचवा टप्पा: २० मे २०२४
२-धुळे, २०-दिंडोरी, २१-नाशिक, २२-पालघर, २३- भिवंडी, २४-कल्याण, २५-ठाणे, २६-मुंबई उत्तर, २७-मुंबई उत्तर-पश्चिम, २८-मुंबई उत्तर पूर्व, २९- मुंबई उत्तर मध्य, ३०-मुंबई दक्षिण मध्य, ३१-मुंबई दक्षिण
#सत्यप्रभा न्युज #नांदेड
тут
9. **Экологичность**: Наши окна соответствуют высшим стандартам экологичности — они безопасны для вас и окружающей среды!
Source:
– okna-plastic-17.ru