मुदखेड दि.७: न्याहळी येथील प्रभु श्रीराम मंदिर च्या कलशारोहण कार्यक्रम दि १५ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
मुदखेड तालुक्यातील एकमेव न्याहळी येथील मारोती मंदीर शेजारी प्रभु श्रीराम दरबार भव्य मंदिर ची स्थापना गेल्या दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती
त्या राम मंदिरावर १५ एप्रिल रोजी श्री मारोती मंदीर संस्थान व समस्त गावकरी यांच्या सहकार्याने भव्य कलशारोहण कार्यक्रम होणार आहे.
न्याहळी हे गाव सीतानदी काठेवर असुन या गावात
भक्तिमय वातावरणात धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होणार असुन दैनंदिन कार्यक्रमाची रुपरेषा दि.९ एप्रिल मंगळवार सकाळी ४ ते ५ गावात प्रभात फेरी, ५ ते ६ काकड आरती. ह भ प. रामदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत दुपारी ४ ते ५ रामकथा, सायंकाळी ६ ते ७ हारिपाठ व जागरण भजन होणार.
प्रभु श्रीराम मंदिरचा कलशारोहण सोहळा व अखंड हारिनाम सप्ताह मि. चैत्र शु.७ शके १९४६
दि.१४ एप्रिल रोज रविवारी ह भ प दता महाराज वळसंगवाडी यांचे किर्तन ९ ते ११ दि. १५ एप्रिल सोमवारी ह भ प भागवताचार्य मनोहर महाराज आळंदीकर यांचे काल्याचे किर्तन १० ते १२ पर्यंत होणार आहे.
कलशारोहण कार्यक्रम श्री अपरंपार स्वामी मठाचे ईश्वर महाराज यांच्या हस्ते बसविण्यात येणार असुन कार्यक्रमाचे आचार्य वे. मु. अविनाश गुरू कुलकर्णी शेवाळकर यांच्या हस्ते होमहवन पार पडणार आहे.
या कार्यक्रमात भजन गायक विश्वनाथ महाराज कदम मुगट, बालाजी महाराज मेंडका, गंगाधर महाराज मुगट, साहेबराव महाराज साळवाडी, होनाजी महाराज साळवाडी, रामदास महाराज पांचाळ, नागोराव महाराज साळवाडी, दत्ता महाराज साळवाडी, मुद्रांक वादक नागनाथ महाराज कदम मुगट यांनी करणार आहेत.
या प्रसंगी हरी महाराज साळवाडी, घरची राम महाराज साळवाडी, रुखमाजी महाराज साळवाडी, पांडुरंग महाराज साळवाडी यांची प्रमुख उपस्थिती हा प्रभु श्रीराम मंदिर च्या कलशारोहण कार्यक्रम साजरा होणार असून या कार्यक्रमाला मुदखेड तालुक्यातून जास्तीत जास्त रामभक्तांनी न्याहाळी येथे महाप्रसादाला उपस्थित राहावे असे आवाहन मारुती मंदिर संस्थान व समस्त गावकरी मंडळी न्याहळीकर यांनी केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड














**mitolyn reviews**
Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.