• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, March 14, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

लोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल्‍ह्यात मतदान प्रशासन सज्‍ज ; मोठ्या संख्‍येने मतदान करण्‍याचे आवाहन

25 April 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 2108604426 1714053241622
32
SHARES
213
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि. २५ : अठराव्‍या लोकसभेसाठी जिल्हा प्रशासनाची निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून उद्या शुक्रवारी सकाळी सात वाजेपासून मतदानास प्रारंभ होणार आहे. आज दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व पोलींग पार्ट्या मतदान केंद्रावर सुखरुप पोहोचल्‍या आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघातील एकूण 2062 मतदान केंद्रावर 18 लक्ष 51 हजार मतदार आपला मताधिकार बजावणार असून २३ उमेदवार रिंगणात आहेत. सायंकाळी सहापर्यंत मतदान होणार असून मतदारांनी मोठ्या संख्‍येने आपल्‍या मतदानाचा हक्‍क बजावावा, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनातर्फे करण्‍यात आला आहे.

जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्‍हावाशियांना आवाहन करतांना आपल्‍या संदेशात जनतेने मोठ्या संख्‍येने मतदान केंद्रावर पोहोचावे, अशी विनंती केली आहे. मतदान केंद्रावर उन्‍हापासून बचावासाठी प्रतिक्षालय उभारण्‍यात आली असून पिण्‍याच्‍या पाण्‍यासह आवश्‍यकतेनुसार आरोग्‍य विषयक उपाययोजना करण्‍यात आल्‍या आहेत. गेल्‍या ७५ दिवसांपासून शासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी कार्यरत असून उद्या शुक्रवारची सुटी मतदानासाठीच उपयोगात आणा असेही त्‍यांनी आपल्‍या संदेशात म्‍हटलेले आहे. उद्या संनियंत्रण कक्षातून जिल्‍ह्यातील सर्व यंत्रणेवर आपले लक्ष राहणार असून निर्भय होऊन आपला मताधिकार वापरण्‍याचे सांगितले आहे.

18 लक्ष 51 हजार मतदार

नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये भोकर (294409), नांदेड उत्तर (346886), नांदेड दक्षिण (308790), नायगाव (301299), देगलूर (303943), मुखेड (296516) असे एकूण 18 लक्ष 51 हजार 843 मतदार यावेळी मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. यामध्ये 9 लक्ष 55 हजार 84 पुरुष तर 8 लक्ष 96 हजार 617 महिला तर 142 तृतीयपंथीयांचा समावेश आहे.

10 हजार 637 कर्मचारी कार्यरत

नांदेड जिल्ह्यामध्ये निवडणुकीसाठी 10 हजार 637 कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये केंद्राध्यक्ष 2766, इतर मतदान अधिकारी 7921, क्षेत्रीय अधिकारी 242, याशिवाय मायक्रो ऑब्जर्वर 39, होम वोटींग करीता 50, अशा अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आलेल्या आहे.

7 हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी

नांदेड जिल्‍ह्यामध्‍ये पोलीस बंदोबस्‍तासाठी एक जिल्‍हा पोलीस अधीक्षक, दोन अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक, 12 पोलीस उपअधीक्षक, 245 अधिकारी, 4272 अंमलदार, 2500 होमगार्ड याशिवाय 6 सीआरपीएफ कंपन्‍या असा तगडा पोलीस बंदोबस्‍त लावण्‍यात आलेला आहे.

मोबाईल वापरावर बंदी

आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक आणि अधिकृत निवडणूक पोलिस अधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिघात, मतदान केंद्राच्‍या परिसरात आणि मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरण्यास बंदी करण्यात आली आहे. त्‍यामुळे मोबाईलशिवाय मतदान करावे. मतदार, निवडणूक कर्मचारी तसेच माध्यम प्रतिनिधींनी देखील याची नोंद घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मतदान केंद्रावर प्रतीक्षालय

नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदान करावे असे आवाहन करताना जिल्हा प्रशासनाने यावेळी नागरिकांना रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी प्रत्येक केंद्रावर प्रतीक्षालय उभारले आहे. याशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती, सावलीची व्यवस्था, रांगेविरहित मतदान, व्हीलचेअरची व्यवस्था, हिरकणी कक्ष व पाळणा घर, आवश्यकता भासल्यास ॲम्बुलन्सची व्यवस्था केली जाणार आहे.

महिला सखी केंद्र तयार

जिल्‍ह्यात 16 ठिकाणी महिला व्यवस्थापनातील मतदान केंद्र आहेत. ते आजच सायंकाळी मतदारांच्‍या स्‍वागतासाठी सज्‍ज झाले आहे. यामध्‍ये भोकर येथील जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा नुतन इमारत, बारड येथील जिल्‍हा परिषद कन्‍या शाळा, उत्‍तर नांदेड मधील वसंत नगर येथील राजर्षी शाहु बालक मंदिर, नांदेड दक्षिण मधील धनेगाव येथील मधुबन महाराज हायस्‍कूल, नायगाव येथील कृषीउत्‍पन्‍न बाजार समिती, देगलूर येथील सावित्रीबाई हायस्‍कूल नवी इमारत, मुखेड येथील गुरुदेव विद्यामंदिर, गुजराती हायस्‍कूल वजिराबाद, नांदेड आदिंचा सहभाग आहे. दिव्यांगांसाठी विशेष अशा सहा मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. 100 टक्के युवक अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती असणारे 16 केंद्र आहेत. इको फ्रेंडली मतदान केंद्राची संख्या 6 आहे तर 5 शाडो मतदान केंद्र आहेत.

32 संवेदनशील केंद्र

जिल्ह्यातील संवेदनशील केंद्रांची यादी नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण २ हजार 62 मतदान केंद्र असून त्यापैकी 32 मतदान केंद्र संवेदनशील केंद्र म्हणून घोषीत केली आहेत. 86 नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघात 5 केंद्र हे संवेदनशील आहेत. यामध्ये केंद्र क्रमांक 139 राजर्षी शाहू विद्यालय वसंतनगर, केंद्र क्रमांक 202 विवेक वर्धिनी हायस्कूल यशवंतनगर, केंद्र क्रमांक 205 नांदेड क्लब स्नेहनगर, केंद्र क्रमांक 241 शासकीय औद्योगिक पी.एस. हॉल नंबर 4, केंद्र क्रमांक 333 इस्लाहुल आलमी माध्यमिक बॉईज स्कूल, रुम नंबर 4, नांदेड दक्षिण मतदान संघात एकूण 10 केंद्र संवेदनशील आहेत. मध्ये 192- गांधी राष्ट्रीय हायस्कूल गाडीपुरा, 115- जिल्हा परिषद हायस्कूल चौफाळा वर्ग आठवी ब, 161- जिल्हा परिषद वाजेगाव उत्तरेकडील रुम, 234- जिल्हा परिषद हायस्कूल बळीरामपूर मतदान केंद्र रुम नंबर २, मतदान केंद्र २८९- जिल्हा परिषद सोनखेड, 295- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवडी बाजार, मतदान केंद्र 212- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौफाळा, मतदान केंद्र १३५- महानगरपालिका हॉस्पिटल करबला, 132- जिल्हा परिषद मतदान केंद्र गर्ल स्कूल गाडीपुरा, 310- जिल्हा परिषद मतदान केंद्र कारेगाव. लोहा विधान मतदार संघात ३ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. यामध्ये मतदान केंद्र क्रमांक 2, नंदगाव, 37- कांजाळा तांडा व मतदान केंद्र 321- कदमाची वाडी. नायगाव विधानसभा मतदारसंघात 6 केंद्र आहेत. यामध्ये मतदान केंद्र 3 काळगाव, 109- गोळेगाव, 110- गोळेगाव, 292- पिंपळगाव, 293- पिंपळगाव, 301- मांजराम वाडी, देगलूर मध्ये मतदान केंद्र 408- अंगणवाडी ईमारत पुंजारवाडी हे केंद्र संवेदनशील आहे. मुखेड मध्ये ७ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. यामध्ये मतदान केंद्र 144 चांडोळा, 298- हसनाळ (पीएम), गोजेगाव येथे मतदान केंद्र क्रमांक 339, 340 व 341, मतदान केंद्र क्रमांक 34 व 35 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव (नि) हे 16 नांदेड मतदार संघात 29 संवेदनशील मतदान केंद्र आहेत.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

लोकसभेच्या ५० टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग यंत्रणा; केंद्रांवरील प्रत्येक हालचालीवर लक्ष

Next Post

धक्कादायक! नांदेडमध्ये युवकाने ईव्हीएम मशिन फोडले

Next Post
image editor output image 848483228 1714132087581

धक्कादायक! नांदेडमध्ये युवकाने ईव्हीएम मशिन फोडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    The Instagram Access Token is expired, Go to the Customizer > JNews : Social, Like & View > Instagram Feed Setting, to refresh it.
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10332
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

7910
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6416
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

391
IMG 20260312 WA0204

वैद्यकीय उपचारासाठी हदगावच्या महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ९ हजाराची मदत

12 March 2026
Screenshot 2026 03 11 21 14 41 86 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7 1

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियानाचे 14 मार्च रोजी पिंपरखेड येथे आयोजन

11 March 2026
Screenshot 2026 03 11 20 46 17 73 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थापकीय अध्यक्ष कालवश एस. एम. प्रधान यांचा स्मृतिदिन संपन्न …

11 March 2026
Screenshot 2026 03 10 21 47 58 14 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

तालुकाकृषी कार्यालय हदगाव येथे महिला दिन उत्साहात संपन्न…..

10 March 2026

Recent News

IMG 20260312 WA0204

वैद्यकीय उपचारासाठी हदगावच्या महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ९ हजाराची मदत

12 March 2026
Screenshot 2026 03 11 21 14 41 86 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7 1

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियानाचे 14 मार्च रोजी पिंपरखेड येथे आयोजन

11 March 2026
Screenshot 2026 03 11 20 46 17 73 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थापकीय अध्यक्ष कालवश एस. एम. प्रधान यांचा स्मृतिदिन संपन्न …

11 March 2026
Screenshot 2026 03 10 21 47 58 14 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

तालुकाकृषी कार्यालय हदगाव येथे महिला दिन उत्साहात संपन्न…..

10 March 2026

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260312 WA0204

वैद्यकीय उपचारासाठी हदगावच्या महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ९ हजाराची मदत

12 March 2026
Screenshot 2026 03 11 21 14 41 86 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7 1

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियानाचे 14 मार्च रोजी पिंपरखेड येथे आयोजन

11 March 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज