• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, May 1, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

कृषी विभागाची जिल्हास्तरीय खरीप पूर्व नियोजन आढावा बैठक संपन्न

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
20 May 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
IMG 20240520 WA0029
32
SHARES
214
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि. 20 :- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यावतीने खरीप हंगाम 2024 पूर्व नियोजन करण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण व जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आयोजित करण्यात आली होती. ही खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांच्या अध्यक्षस्थानी संपन्न झाली.

या बैठकीस मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील कीडरोग शास्त्रज्ञ प्रा. कृष्णा अंभोरे, शास्त्रज्ञ व्यंकट शिंदे, नांदेडचे उपविभागीय कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, किनवटचे उपविभागीय कृषी अधिकारी राजकुमार रणवीर, देगलूरचे उपविभागीय कृषी अधिकारी एस.एस.गायकवाड, कृषी विकास अधिकारी विजय बेतीवार यांची उपस्थिती होती.

खरीप हंगामाच्या पूर्वनियोजनासाठी उपविभागीय कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या खरीप हंगाम जनजागृती मोहीम-2024 कृषी मार्गदर्शिका या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यांनी केलेल्या खरीप हंगाम पूर्व तयारीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये कृषी सहायक यांनी खरीप हंगामपूर्व तयारी आणि कृषी विषयक कामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गावनिहाय आराखड्याचे माध्यमातून नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

या कार्यक्रमात गावनिहाय कृषी नियोजन आराखडे तयार करणे, प्रत्येक गावात सोयाबीन बियाण्याचे पेरणीपूर्व उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिके घेणे, बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून संपूर्ण क्षेत्रावर बियाण्याची बीज प्रक्रिया करूनच पेरणी होईल याची दक्षता घेणे, शंखी गोगलगाय आणि पैसा/वाणू प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन इत्यादी कृषी विषयक कामांचा तसेच रुंद वरंबा सरी पद्धतीने व टोकण यंत्राद्वारे बेडवर खरीप पिकांची प्रति कृषी सहाय्यक किमान 100 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे आयोजन करणे, विहित कालावधीत माती नमुने गोळा करणे या कामांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अर्ज ऑनलाईन करून घेण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सर्व गावातील शेतकऱ्यांचे व्हाट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून त्यावर कृषी माहितीपर संदेश आणि तांत्रिक मार्गदर्शनाचे युट्युब व्हिडिओ पाठविणेविषयी त्यांनी सुचित केले. तसेच कृषी विषयक खरीप हंगाम पूर्व प्रचार प्रसिद्धीसाठी प्रत्येक उपविभागात प्रचार रथ आणि घडी पत्रिका वाटपाच्या माध्यमातून शेतकरी जागृती करण्याविषयी त्यांनी सूचित केले. तसेच ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा आदी भरडधान्य पिकांचे पेरणी क्षेत्र वाढवावे अशा सूचना दिल्या.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे यांनी पीक संरक्षण औषधीवरील खर्च कमी करण्यासाठी पहिल्या तीन फवारणी या 5 टक्के निंबोळी अर्काच्या करणे, ग्राम कृषी विकास समितीमध्ये गाव आराखड्यांना मान्यता घेणे, ऊस पिकाचे पाचट व्यवस्थापनात संबंधित साखर कारखान्यांचा सहभाग घेणे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत, कृषी आराखड्यात पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेतीचा समावेश करणे इत्यादी मुद्द्यावर मार्गदर्शन केले. तसेच येत्या खरीप हंगामामध्ये मुबलक बियाणे, खते यांची उपलब्धता असून शेतकऱ्यांनी कपाशीच्या विशिष्ट वाणांचा आग्रह टाळण्याविषयी प्रचार प्रसिद्धी करणेबाबत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सूचित केले. तसेच त्यांनी येत्या खरीप हंगामामध्ये गोगलगाय व्यवस्थापन, सोयाबीनवरील पिवळा मोझॅक, तूर पिकावरील मर रोग येवू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, मूग, उडीद व हळद पिकांचे लागवड तंत्रज्ञानाविषयी आणि सुधारित वाणाविषयी माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील शास्त्रज्ञ कृष्णा अंभोरे यांनी खरीप हंगामातील प्रमुख पिकावरील कीडरोग व्यवस्थापन सोयाबीन पिकातील शंखी गोगलगाय, पिवळा मोझाक तसेच कापूस पिकातील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापनाविषयी सखोल तांत्रिक मार्गदर्शन केले. या बैठकीमध्ये मागील वर्षात उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या उपविभागनिहाय निवडक क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांचा विभागीय कृषी सहसंचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे हस्ते प्रशस्तीपत्र व ग्रामगीता पुस्तक देवून गौरव करण्यात आला. यामध्ये गित्ते व्ही.बी, गुट्टे एम.एस, दिक्कतवार श्रीमती कदम, गजेवाड बी.बी, जाधव डी.व्ही, मिसाळ रामहरी बाळू, वानखेडे निलेश रामराव, श्रीमती सोनकांबळे सी.जी, गित्ते जे.एस, तिडके एस.एन, वरपडे एस.डी, कावटवाड एस. टी, चटलावार एम.जी. आदींचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहायक वसंत जारीकोटे यांनी केले, तर आभार उपविभागीय कृषी अधिकारी किनवट राजकुमार रणवीर यांनी मानले.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

अल्पवयीन बालकाकडुन चोरीच्या दोन व एक बेवारस मोटरसायकल जप्त केली वजीराबाद गुन्हे शोध पथकाची कामगिरी

Next Post

पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड हदीत 02 घर फोडी करणा-या सराईत आरोपीस अटक करुन त्यांचे कडून 111 ग्रॅम सोने व इतर साहीत्य असा एकुण 5,40,000/-रुपयाचा मुद्देमाल केला जप्त

Next Post
IMG 20240520 WA0023

पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड हदीत 02 घर फोडी करणा-या सराईत आरोपीस अटक करुन त्यांचे कडून 111 ग्रॅम सोने व इतर साहीत्य असा एकुण 5,40,000/-रुपयाचा मुद्देमाल केला जप्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • एकनाथ शिंदे हे विधानपरिषदेच्या उमेदवाराचे नाव जाहीर करतील. बच्चू कडू माझे मित्र आहेत, आमचीही चर्चा झाली. शिंदे साहेब अंतिम निर्णय घेतील. विधानपरिषद निवडणुकीत 9 जागा असतील, पण 10 उमेदवार रिंगणात उतरले तर बिनविरोध निवडणूक कशी होणार? पण महायुतीचे 9 उमेदवार विजयी होतील. - उदय सामंत, उद्योगमंत्री#UdaySamant #EknathShinde #Mahayuti #BacchuKadu #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • मी 4 वेळा निवडून आलो 10 आमदाराचं मी एकटाच काम करतो. मी जर मंत्री झालो तर मी एकटाच दहा मंत्र्यांच काम करेल.#MarathiNews #SatyaprabhaNews  #ravirana #politics #MaharashtraPolitics
  • सेन्सेक्स २०० अंकांनी कोसळला, निफ्टी २४,००० वर! आज भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात दबाव पाहायला मिळाला. अमेरिका आणि इराणमधील बिघडत्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली. प्रामुख्याने पीएसयू बँक (PSU Bank) आणि फायनान्शिअल शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बाजार खाली आला. निफ्टी २४,००० च्या स्तरावर संघर्ष करत असताना सेन्सेक्समध्येही १५० हून अधिक अंकांची घसरण नोंदवण्यात आली. #SatyaprabhaNews  #StockMarket #Sensex #Nifty #ShareMarketIndia
  • लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान#Latur #Heat #Akola #LatestNews #Maharashtra SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • अभियंत्यावर चिखल फेकल्याप्रकरणी नितेश राणेंना 1 महिन्याचा कारावास, मात्र तात्काळ शिक्षेला स्थगिती#NiteshRane #maharashtra #MarathiNews #SatyaprabhaNews
  • अजितदादांच्या अपघाताला परवा
तीन महीने होत आहेत मात्र अद्यापही
तपास पुढे सरकलेला नाही,
CID नेमकं काय करतंय हे
देखील कळायला मार्ग नाही! : रोहित पवार#NAjitPawar #SatyaprabhaNews #rohitpawar #bageshwarbaba
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10426
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8153
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

4006
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
IMG 20260422 WA0204

आरक्षण वर्गीकरणासाठी सोमवारी आझाद मैदानावर ‘महा वज्रमूठ’ आंदोलन…

25 April 2026
IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026

Recent News

Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
IMG 20260422 WA0204

आरक्षण वर्गीकरणासाठी सोमवारी आझाद मैदानावर ‘महा वज्रमूठ’ आंदोलन…

25 April 2026
IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज