नांदेड दि.७: महाराष्ट्र सरकारच्या वतीने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली असून त्यामध्ये प्रत्येक महिलांना महिन्याला पंधराशे रुपये मिळणार असून ते पैसे महिलांना घर खर्चासाठी उपयोगी येणार असल्याने ही योजना महिलांच्या हिताची असून त्यांना दिलासा देणारी असून राज्य सरकारच्या योजना हे गोरगरीब सामान्य जनतेच्या व महिलांच्या हिताच्या असल्याचे मत नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित केलेल्या आढावा बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना केले
यावेळी जिल्हाप्रमुख आनंद बोंढारे. गंगाधर बडूरे सरपंच संघटनेचे कदम महिला जिल्हाध्यक्ष थोरवट ताई शहर अध्यक्ष लताताई शेळके संजय शेळके आदी मान्यवरांची उपस्थिती
पुढे बोलताना म्हणाले की राज्य सरकारने महिलांसाठी एक चांगला निर्णय घेतला असून त्यामुळे महिलांना दिलासा मिळणार आहेत या पंधराशे रुपये त्यांच्या कुटुंबासाठी आधार म्हणून मिळणार आहे एका कुटुंबातील दोन महिलेंना योजनांचा लाभ मिळणार आहे ही योजना गोरगरीब सामान्य महिलांच्या हिताची आहेत व त्याचबरोबर शिवसेना शिंदे पक्ष वाढण्यासाठी आढावा बैठक घेऊन त्यामध्ये भूतनीय सदस्य नोंदणीच्याही मार्गदर्शन करण्यात आले येणाऱ्या विधानसभेमध्ये शिवसेना शिंदे गट जोमाने काम करून विधानसभेवर जास्तीत जास्त उमेदवार निवडून देण्यासाठी सर्वांनी कामाला लागावं असा संदेशही त्यांनी या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना दिला.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड













