आगामी विधानसभेत पक्ष वाढीसाठी जोमाने काम करणार :स्वागत आयनेमीवार
नांदेड प्रतिनिधी दि.१०: देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी विधानसभेमध्ये पक्षाची ताकद नांदेड उत्तर विधानसभेमध्ये वाढवण्यासाठी मोठ्या ताकतीने भारतीय जनता पार्टीचे काम वाढविण्यासाठी भाजपा युवा मोर्चाच्या नांदेड उत्तर जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वागत आयनेमिवार यांच्यावर देऊन भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ देशमुख यांनी त्यांच्यावर नवीन जबाबदारी देऊन त्यांना नियुक्तीपत्र दिले….
याबाबत सविस्तर वृत्त असे की किनवट माहूर हदगाव हिमायतनगर सह भोकर विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद व पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी भाजपा जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख व किनवट माहूर विधानसभेचे प्रमुख तथा विद्यमान आमदार भीमरावजी केराम साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष म्हणून स्वागत केशवराव आयनेमिवार यांना आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी नियुक्त पत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या त्यांच्या या निवडीबद्दल नांदेड उत्तर मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे या निवडीबद्दल बोलताना आयनेमिवार यांनी असे सांगितले की आगामी विधानसभेच्या तोंडावर नांदेड उत्तर विधानसभेतील सर्व मतदार संघात भाजपा पक्ष वाढीसाठी मोठ्या जोमाने काम करेल आगामी विधानसभेमध्ये भाजपाचा झेंडा कसा फडकवता येईल या दृष्टिकोनातून पक्षश्रेष्ठींच्या सल्ल्याने काम करेल व भाजपा पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे त्याचे मी नक्कीच आगामी काळात फलित करून दाखवेल असे बोलताना सांगितले यावेळी भारतीय जनता पार्टीचे असंख्य पदाधिकारी व युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस दुर्गेश मंडोजवार,कल्याण ठाकूर,भाजपा युवा मोर्चाचे हिमायतनगर शहर अध्यक्ष शीतल सेवनकर , सह आदी जणांनी त्यांचे फोन द्वारे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड






















online casino mit startguthaben
References:
https://flibustier.top/user/paperradio29