• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, June 24, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

सफाई कर्मचाऱ्याना कायदेशीर सर्व सोयी -सुविधा पुरवा : पी.पी.वावा

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
7 October 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image1402678075 1728312628874
32
SHARES
213
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग सदस्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांचा आढावा

नांदेड दि.७  : सफाई कामगारांसंदर्भात असणारे कायदे, त्यांच्या सुविधा, शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणारे निर्देश यांचे काटेकोर पालन नांदेड महानगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये झाले पाहिजे. त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी अधिनस्त अधिकाऱ्यांना संबधित कायद्याचे पालन करण्याचे निर्देश द्यावे, असे आवाहन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य पी.पी.वावा यांनी आज येथे केले.राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य पी.पी.वावा सध्या नांदेड दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे आज बैठक संपन्न झाली. या बैठकीत नांदेड महानगरपालिकेतील व जिल्ह्यातील इतर नगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सद्यस्थितीचा आढावा आयोगाच्या सदस्यांनी घेतला.

या बैठकीस मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपआयुक्त कारभारी दिवेकर, जिल्हा प्रशासन अधिकारी गंगाधर ईरलोड, सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादेक, शहर अभियंता सुमंत पाटील तसेच जिल्ह्यातील इतर नगरपालिकेच्या मुख्यधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

सर्वप्रथम राष्ट्रीय कर्मचारी आयोगाचे सदस्य पी.पी.वावा यांचे व त्यांच्या सहकारी वर्गाचे मनपा आयुक्तांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. बैठकीच्या सुरुवातीस मनपाचे उपआयुक्त कारभारी दिवेकर यांनी महानगरपालिकेतील कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सादरीकरण केले. ज्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रात एकूण ०६ झोन असून त्यातील २० प्रभागामध्ये संपूर्ण शहराच्या साफ-सफाईचे कामे कायम व कंत्राटदारामार्फत नेमलेल्या सफाई कामगारांमार्फत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

महानगरपालिकेच्या मंजूर आकृतीबंधानुसार सफाई कामगारांची एकूण मंजुर पदसंख्या ८०५ असुन त्यापैकी आजमितीस ५३१ कायम कामगार कार्यरत आहेत. तर २७४ कायम सफाई कागारांची पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे कंत्राटदारामार्फत एकुण ४०६ सफाई कर्मचारी कार्यरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

महानगरपालिकेत महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना वारसा हक्काने नियुक्त्या दिल्या जातात. तसेच मनपा आस्थापनेवर स्थापनेपासून सफाई कर्मचाऱ्यांना वाहन चालक, लिपीक, इत्यादी गट-क मधील पदावर पदोन्नत्या देण्यात येत असतात मागील दोन वर्षाच्या कालावधीत्त एकूण ५५ सफाई कामगारांना पदोन्नती देण्यात आल्याचे यावेळी उपआयुक्तांनी सांगितले.

महानगरपालिकेत सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी दरवर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन करुन आरोग्य विषयक तपासण्या करुन उपचार केल्या जातात. तसेच महानगरपालिकेच्या सफाई कामागाराना मास्क, हँडग्लोज, एप्रॉन, नाली फावडा, टोपले, नारळी झाडु, रेनकोट, गमबूट इत्यादी स्वच्छता विषयक साहित्य देण्यात येते. त्याचप्रमाणे ड्रेनेज विभागा अंतर्गत वॉटरप्रुफ बुट, रिचार्जेबल बॅटरी, सेफ्टी बेल्ट, सेफ्टी ग्लोज, सर्च लाईट, सेफ्टी गमशुट, नायलॉन लॉडर, नॉर्मल फेस मास्क, सेफ्टी हेल्मेट इत्यादी साहित्य पुरविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

महानगरपालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात सफाई आयोगाच्या सदस्यांनी विचारणा केली असता कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन अदाई केल्या जात आहे. तसेच ईपीएफ व इएसआयसी, ५ टक्के घरभाडे भत्ता अदाई करण्यात येत असल्याचे मनपा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. तसेच सफाई कामगारांना सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाचा आर्थिक मोबदला सुध्दा दिल्या जातो असे नमुद करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रम-साफल्य योजने अंतर्गत ८१ सफाई कामागारांना मोफत सदनिकेचा ताबा दिला असल्याचे यावेळी मनपाच्यावतीने सांगण्यात आले.
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांनी यावेळी कामगार नेत्यांनाही आपली भुमिका मांडण्याचे आवाहन केल्यानंतर महापालिका कर्मचारी युनियनचे संस्थापक अध्यक्ष कॉ.गणेश शिंगे यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. तसेच सफाई कामगारांसाठी स्वतंत्र वसाहत स्थापण करण्याची मागणी केली. त्यावर राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन मनपा आयुक्तांना या विषयात लक्ष घालण्याचे निर्देश दिले. एकंदरीत बैठकीच्या समारोपास आयोगाच्या सदस्यांनी महानगरपालिकेच्या कामावर समाधान व्यक्त करुन बैठकीची सांगता करण्यात आली. बैठक संपल्यानंतर आयोगाच्या सदस्यांना जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी सुद्धा भेट दिली. या बैठकीचे सुत्रसंचालन मनपाच्या जनसंपर्क विभागाचे सुमेध बनसोडे यांनी तर आभार प्रदर्शन अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी केले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

निवडणूक विषयक सोपविलेली कामे गांभीर्याने करा : जिल्हाधिकारी

Next Post

शासकीय जमिनीवर बेकायदेशीर ताबा दाखवाल तर गंभीर कारवाई करू : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post
image editor output image 181627075 1728312757676

शासकीय जमिनीवर बेकायदेशीर ताबा दाखवाल तर गंभीर कारवाई करू : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • कालच्या ठळक घडामोडी पहा...
.
#SatyaprabbaNews #SanjayRaut #DevendraFadnavis #MarathiNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • राज्यात लोडशेडिंग केलेले नाही, उलट विक्रमी 32,000 मेगावॅट विजेचा पुरवठा केला असून, पुढील 5 वर्षात ही क्षमता 45,000 मेगावॅटपर्यंत वाढवणार.
#DevendraFadanvis #MarathiNews #SatyaprabhaNews #BreakingNews #light
  • राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने काही ठराविक शिक्षकांवर विश्वास ठेवला होता, पण त्यापैकी काहींनी आपली जबाबदारी पार पाडली नाही. रक्षकच भक्षक बनले. देशभरातील अभ्यासू विद्यार्थ्यांनी खूप चांगली कामगिरी केली. यापुढेही त्यांना चांगले मार्क पडतील.
#DharmendraPradhan #NEET #Exam #SatyaprabhaNews #BreakingNews
  • राज्यातील सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात याच उत्तम उदाहरण तुकाराम मुंढे आहेत. मुंढेंमुळे चुकीच्या गोष्टी बंद झाल्या, माझ्या भागात गुटखा-मावा मिळत नाही -बच्चू कडू, आमदार, शिवसेना शिंदे गट
#BacchuKadu #SatyaprabhaNews #TukaramMundhe #maharashtra #MarathiNews
  • एका खासदाराचा 16 कोटी निधी शिल्लक आहे. एकाने शिर्डीत फक्त 25 लाख खर्च केले. आता नवीन गटात गेल्यामुळे त्यांना निधी म्हणजे ठेकेदारी मिळणार आहे. ठेकेदारीतून कमिशन मिळणे हा त्यांचा मान-सन्मान आहे. - संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे गट
#SanjayRaut #MaharashtraPolitics #SatyaprabhaNews #MarathiNews #LatestNews
  • मिंधे गटात गेल्यावर संजय दिना पाटील हे खोटे बोलत आहेत. संजय दिना पाटील यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आपली मुलगी राजुल पाटील हिला उमदेवारी मिळावी, यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मुलीच्या उमेदवारीसाठी संजय दिना पाटील यांनी खूप तमाशा घातला होता. मुलीला उमेदवारी दिली नाही तर मी राजीनामा देतो, असे बोलण्यापर्यंत संजय पाटील यांची मजल गेली होती.
-संजय राऊत, खासदार (ठाकरे गट)
#SanjayRaut #SanjayDinaPatil #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #MarathiNews
  • काल जोर का झटका दिला त्यामुळे त्यांचे (ठाकरेंचं) मानसिक संतुलन बिघडले आहे. आणखी झटके देणार आहे. - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
#EknathShinde #AdityaThackeray #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #MarathiNews LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026

Recent News

Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज