लोकशाही पद्धतीने निवडणुक संपन्न
दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि.१: व्हॉईस ऑफ मीडिया,धर्माबाद तालुक्याचे शिलेदार लोकशाही पद्धतीने काल शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत जिल्हा कार्यकारणी समोर निवडण्यात आले.
यात संजय कदम यांची बिनविरोध तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर संजय झगडे (कार्याध्यक्ष ),दत्तात्रय सज्जन (उपाध्यक्ष),गंगाप्रसाद सोनकांबळे(सचिव),राजेश सोनकांबळे (सहसचिव),नारायण इबितवार (कोषाध्यक्ष),
साहेबराव सोनकांबळे (संघटक),झकिउद्दिन सर (सल्लागार),
सुरेश घाळे (सल्लागार),चैतन्य घाटे (सदस्य) इत्यादी कार्यकारणी गठित करण्यात आली असून निवडणुकीच्या वेळी जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ. गणेश जोशी, निवडणूक अधिकारी कार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम सावंत,जिल्हा संघटक ऋषिकेश कोंडेकर जिल्हा कार्यकारणी सदस्य मनोज बुंदेले आणि धर्माबाद येथील पत्रकार बांधव उपस्थित होते.
चौकट
व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटना ही जागतिक दर्जाची संघटना झाली असून फक्त पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी झगडत आहे. त्यामुळे आपापसातील मतभेद विसरून सर्व पत्रकार संघटनेच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांनी व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ.गणेश जोशी यांनी आपल्या मनोगतात यावेळी केले.
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड













