पुणे : स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी नराधम दत्ता गाडेला पुणे न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शिरुरमधून त्याला अटक करण्यात आली होती आणि पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. या प्रकरणात आरोपीसोबत आणखी साथिदार आहेत का याचा तपास करायचा आहे. तसेच या प्रकरणातील आरोपीचा मोबाईल हस्तगत करायचा असून त्याला पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.
मंगळवारी पहाटे स्वारगेट बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या एका बसमध्ये दत्ता गाडेने 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. यानंतर दत्ता गाडे पसार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी आठ पथकं पाठवली होती. दोन दिवस शोध घेतल्यानंतर शुक्रवारी पहाटे शिरुरमधून दत्ता गाडेला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद काय?
आरोपीवर दाखल असलेल्या 6 गुन्ह्यापैकी 5 गुन्ह्यात तक्रारदार महिला आहेत. त्यामुळे त्याचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे ते स्पष्ट होते आहे. या गुन्ह्यामुळे समाजात तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यामुळे हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपचा आहे. आरोपी सराईत असल्याने त्याने यापूर्वी आणखी काही महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत गैरकृत्य केलेले आहे का हे तपसायचे आहे. त्याचबरोबर आरोपीला मदत करणारे आणखी काहीजण त्याच्यासोबत आहेत का हे तपासायचे आहे.
या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी 14 दिवसांची पोलिस कोठडी आवश्यक आहे. सरकारी वकिलांनीही याआधी गुन्ह्याची आणि आरोपीवर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती दिली. आतापर्यंत या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज, गुन्ह्याच्या वेळी वापरलेले कपडे तसेच आणखी काही मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत.
आरोपीने तरुणीला कडेंक्टर असल्याचं भासवत विश्वास संपादन केला. बसमध्ये अनेक लोक असल्याचं त्याने भासवले. पण बस पूर्ण रिकामी होती. फिर्यादीने बसमधून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तरुणीने बाहेर सोडा अशी विनंती केली. पण आरोपीने जबरदस्तीने अत्याचार केला. मारहाण करून दोन वेळा लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तो पळून गेला.
या प्रकरणी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही तपासले आणि दत्ता गाडेला अटक केली. आरोपी अत्यंत सराईत असून मोबाईल बंद करून फिरत होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपीचे मोबाईल, कपडे जप्त करायचे आहेत, त्याची वैद्यकीय तपासणी करायची आहे. त्याचे इतर कुणी साथीदार आहेत का याचा तपास करायचा आहे. त्याने कुणाकडे आसरा घेतला याचा तपास कार्याचा आहे. त्याच्यावर एकूण 6 गुन्हे दाखल आहेत. त्याने असे अजून काही गुन्हे केले आहेत का पहाव लागेल. त्यासाठी आरोपीची 14 दिवसाची पोलिस कोठडी द्यावी.














Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me? https://accounts.binance.info/ru-UA/register?ref=JVDCDCK4
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.