नांदेड दि २३ | डी मार्ट परिसरातील शरदचंद्र पवार लॉ कॉलेजमधील करिअर कौन्सिलिंग आणि नॅक कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार आणि संस्थेच्या सरचिटणीस डॉ.ज्योती धोंडगे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील धोंडगे, प्राचार्य डॉ. बी. एम. अली यांची उपस्थिती होती.
डी मार्ट परिसरात असलेल्या शरदचंद्र पवार विधी महाविद्यालयात शनिवार 22 मार्च रोजी सकाळी महाविद्यालयात नव्याने उभारण्यात आलेल्या नॅक कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयातील प्रांगणात करिअर कौन्सिलिंगचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नांदेड जिल्हा बार असोसिएशन अध्यक्ष एडवोकेट आशिष गोदमगावकर , डॉ.सुनील धोंडगे, प्राचार्य डॉ. अली, उपप्राचार्य डॉ अमर संगू उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी बी एस एल , एलएलबी आणि एल एम एल चे विद्यार्थी ,विद्यार्थिनी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड