नांदेड दि.२५: कॉमेडी गायक कुणाल कामरानी जो वादग्रस्त गीत तयार करून सबंध राज्यांमध्ये वाद निर्माण करून राज्यातील शिवसैनिकांचा रोष स्वतःच्या अंगावर ओढून घेतला. तसेच आम्हा शिवसैनिकाची अस्मिता असणारे आमचे नेते शिंदे साहेबाला गीताच्या माध्यमातून बदनाम करण्याचा जो कट रचला आहे त्यामुळे एकनाथ भाई शिंदे यांना मानणाऱ्या शिवसैनिकांच्या भावना दुखाविल्या आहेत. त्या कुणाल कामरांचा मी जाहीर निषेध करतो. विकासाचे महामेरू असणारे आमचे नेते आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांना बदनाम करण्याचा जो कट करण्यात आलेला आहे तो आम्ही हाणून पाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आमचे नेते एकनाथ भाई शिंदे हे आमचे जीव की प्राण आहेत तसेच एकनाथ भाई शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर असताना प्रत्येक शिवसैनिकांना पोटच्या मुलाच्या पलीकडे जपले तसेच सबंध राज्यामध्ये विविध विकासाची कामे आणून व महाराष्ट्र राज्यांच्या प्रगतीसाठी विकास कामाचे धडाधड निर्णय घेऊन सबंध देशांमध्ये एक आपली वेगळी छाप निर्माण करून नावलौकिक केले, परंतु काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक कुणाल कामरासारख्या लोकांना सुपाऱ्या देऊन हाताशी धरून आमचे नेते या महाराष्ट्र राज्याचे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे काम करीत आहे. अशा महाभागांना आम्ही राज्यात फिरू देणार नाही. कुणाल कामरा जिथे दिसेल तिथे आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांची धुलाई करू असा गर्भित इशारा शिवसेना शिंदे गटाचे नांदेड जिल्हा प्रमुख विवेक देशमुख यांनी दिलेला आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड