तुषार कांबळे (हदगाव प्रतिनिधी) | हदगाव येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग बेताल व भोंगळ कारभाराणे चर्चेत आहे. हदगावच्या तहसील या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यावर कार्यवाही होत नसल्यामुळे मनमानी कारभार सुरूच असल्यामुळे सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयाच्या येरझारा करून मजुरी बुडवाव लागत आहे. ग्रामीण भागामध्ये राशन दुकानदार लाभार्थ्यांना तुमचं राशन आले नाही तुम चे हे नाही ते नाही म्हणून राशन वाटप करत नाही. त्यामुळे राशन दुकानदार यांच्याकडे राशन घेण्याकरिता गेल्यावर अपमानजनक वागणूक दिली जात आहे.
बघू पुन्हा देऊत असे उडवाउडवीचे उत्तर देऊन राशन दुकानाबाहेर काढून दिले जाते. काही लाभार्थ्यांनी आमच्याशी संपर्क करून संवाद साधला आणि त्यांच्या तक्रारी अश्या आहेत राशन दुकानदार गहु, तांदूळ, कमी देतो आणि चार महिन्यापासून साखर सुद्धा वाटप करत नाहीत या नाहक त्रासाला लाभार्थी कंटाळून गेले स्वस्त धान्य दुकानदार संघटना हे गहु तांदूळ साखर याम ध्ये खूप मोठा भ्रष्टाचार करत असल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे हदगाव तालुक्यामध्ये राशन मध्ये चालू असलेला भष्टाचार थांबून न्याय मिळेल का हदगाव तालुक्यातील राशन दुकानदार आणि त्यांच्या संघटनेवर लोकप्रतिनिधी लक्ष देतील का? देतील तर कधी? अशा विविध प्रश्न जनतेच्या मनात उद्भवत आहेत. त्यामुळे राशन दुकानदार आणि संघटना मनमानी करत आहेत त्याचं कोणीही काही वाकड करू शकत नाही राजकारणी लोक त्यांच्या सोबत असल्यामुळे त्यांचावर आत्तापर्यंत कुठलीच कार्यवाही झालेली दिसून येत नाही नाही त्यामुळे राशन मध्ये मोठ्या प्रमाणात भष्टाचार सुरूच आहे.
या पुरवठा विभागाच्या मुजोर अधिकारी आणि राशन दुकानदार यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी? जनतेची मागणी तात्काळ कार्यवाही नाही झाल्यास आम्ही न्यायासाठी अन्न पुरवठा मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असे लाभार्थी आमच्याशी बोलतांना म्हणाले.