दत्तात्रय सज्जन | धर्माबाद दि.६ | तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातील दोन युवकांनी क्रिकेटच्या सामन्यांवर सट्टा खेळल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या दोन युवकांनी आपली जीवनयात्रा संपवली असल्यामुळे तेलंगणा पोलिस ॲक्शन मोडवर येऊन तेलंगणा राज्यातील काही सट्टेबाजांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, मुख्य सुत्रधार धर्माबाद येथील असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे धर्माबाद शहरातील मटकाकिंग व सट्टेवाले भूमीगत झाल्याचे चित्र दिसत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील मटकाकिंग व सट्टेवाले ऑनलाईन पद्धतीने मटका व सट्टा खुलेआम घेत फिरत असल्याचे चित्र शहरातील जनतेला दिसत आहे. सदरील प्रकरणाची चौकशी करून दोषी असलेल्या मटका किंग व सट्टेवाले यांना अटक करण्याची मागणी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी करीत होते. परंतु येथील पोलिस प्रशासन चोर सोडून संन्यासाला शिक्षा देऊन वरीष्ठ अधिकाऱ्यांपुढे आपली पाठ ठोठावून घेत असल्याची चर्चा शहरातील जनतेत सुरू आहे. ऐवढेच नसून बाळापूर येथील एक युवकांनी सट्टा खेळून लाखों रुपयांचा कर्जबाजारी झाल्यामुळे सदरील कर्ज फेडण्यासाठी तो आपल्या वडीलांना तगादा लावला होता. कर्ज फेडण्यासाठी मला पैसे द्या. अनथा मी आपली जीवनयात्रा संपविन अशी धमकी तो आपल्याच वडीलांना वारंवार देत असल्यामुळे अखेर वडिलांनीच रेल्वेखाली पडून आपली जीवनयात्रा संपवली आहे. असे अनेक उदाहरणे शहरातील देता येतात.
परंतु सदरील प्रकरणाकडे येथील पोलिस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे शहरातील मटकाकिंग व सट्टेवाले यांचे मनोबल वाढले आहे. मटका व सट्टा शहरात खुलेआम घेऊन शहरातील दोन मटका किंग व असंख्य सट्टेवाले मालामाल झाले आहेत. शहरातील अनेक ठिकाणी त्यांनी करोडोंची संपत्ती घेऊन ठेवली असल्याचे चित्र दिसत आहेत. निजामाबाद जिल्ह्यातील दोन युवकांनी क्रिकेटच्या सामन्यांवर लाखों रुपये हरल्यामुळे त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. सदरील प्रकरणाचा तपास निजामाबाद येथील पोलिस जलदगतीने करीत काही सट्टेबाजांना ताब्यात घेतले असता, मुख्य सुत्रधार हा धर्माबाद येथील असल्याचे तेलंगणा राज्यातील सोशल मीडियावर झळकताच शनिवारी सकाळ पासूनच शहरातील मटकाकिंग व सट्टेवाले भूमीगत झाल्याचे चित्र दिसत आहेत. सदरील प्रकरणाचा तपास करण्यासाठी तेलंगणा राज्यातील पोलिस धर्माबाद येथे केंव्हाही येऊ शकतात, याची भीती मनात बाळगून शहरातील मटकाकिंग व सट्टेवाले भूमीगत झाले आहेत.
शहरातील मटकाकिंग व सट्टेवाले यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे पोलिस प्रशासनाची भीती राहिली नाही. शहरातील सट्टेवाले व मटका किंग यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन नियमानुसार कठोर कारवाई केल्यास पुढील अनर्थ टळणार आहे. अनथा पोलिस प्रशासनाच्या विरोधात आता शहरातील पालकवर्ग रस्त्यावर उतरणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरील प्रकरणाकडे पोलिस उपमहानिरीक्षक परीक्षेत्र नांदेड शाहाजी उमाप व जिल्हा पोलिस अधीक्षक नांदेड यांनी काय कारवाई करतील, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष केंद्रित झाले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड