तुषार कांबळे : हदगाव प्रतिनिधी | नागरिकाबरोबरच शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात ?, पोलिस आणि अन्न औषध प्रशासन विभाग गप्प का ?
हदगावतालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या तामसा शहरात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला सितार, गोवा, माणिकचंद, राज निवास, रजनीगंधा. ह्या गुटक्याची ठोक आणि किरकोळ विक्री राजरोसपणे चालू असून एवढेच नाही तर तामशाचे “मेन” “गुटखा तस्कर” “आंध्रप्रदेशातून “भोकर हिमायतनगर, मार्गे गुटक्याच्या गाड्या आणून हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, बाळापुर, वारंगा अशा अनेक शहरात आणि गावात अनेक तालुक्यात बेधडक अनेक विविधचार चाकी गाडीत गुटखा भरून राजरोसपणे पाठवून ठोक विक्री करून
तामसा येथील गुटखा तस्कर सर्वसामान्य जनतेच्या आणि शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि जीवितासी खेळत असून आणि निधड्या छातीने आम्ही पोलीस प्रशासन आणि अन्न औषध प्रशासन विभागाला अर्थपूर्ण संबंधातून शर्मिंदे करून कायदा खुर्चीला बांधून ठेवला असल्याची चर्चा तामसा येथील गुटखा तस्करात अनेक पानपट्टीवर होत असून नांदेड परिक्षेत्राचे उपपोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, यांच्या अवैध धंदे विरोधी ध्येय धोरणानुसार जिल्ह्याचे नांदेडजिल्हा पोलीस अधीक्षक ह्यांनी मटका, जुगार नांदेड जिल्ह्य हदगाव तालुक्यातून हद्दपार करून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला असून तसेच तामसा शहरातील राजरोसपणे आणि किराणा दुकान पान शॉप पानपट्टी हॉटेल वरराजमापणे होत असलेली गुटखा तस्करी आणि विक्री तामशातील मेन तस्कर, तस्कराविरुद्ध गुन्हे दाखल करून बेकायदा अवैध गुटखा तस्करी आणि तामसा शहर आणि परिसरातील संपूर्ण गुटखा विक्री कायदेशीर बंद करून सर्वसामान्य जनते बरोबरच शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याला दिलासा द्यावा अशी आशयाची मागणी हदगाव तालुक्याच्या तामसा शहरातील जनतेत जोर धरत