पुणे | १० एप्रिल २०२५ | पुणेस्थित आघाडीच्या रिअल इस्टेट कंपनी मंत्रा ग्रुपने ‘बर्गंडी’ या नव्या लक्झरी ब्रँडच्या लॉन्चसह एक परिवर्तनात्मक वर्ष साजरं केलं आहे. शहरी उच्चवर्गाच्या बदलत्या अपेकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला हा ब्रँड, आधुनिक डिझाईन, निवडक सुविधांची रचना आणि उन्नत जीवनशैली यांचा उत्कृष्ट समन्वय साधतो. बर्गंडीअंतर्गत कंपनीने तीन भव्य प्रकल्प सादर केले असून, हे प्रकल्प वैभव, दर्जा आणि खासगीपणाचे प्रतीक ठरले आहेत.
या यशस्वी वाटचालीत भर घालत, मंत्राने आर्थिक वर्षाचा समारोप तब्बल ₹१०२० कोटींच्या इन्व्हेंटरी विक्रीसह केला आहे — जो ग्राहकांचा विश्वास, बाजाराशी सुसंगत उत्पादन आणि ब्रँडच्या वाढत्या प्रभावाचं स्पष्ट प्रतिबिंब आहे. अनेक प्रकल्प अत्यंत अल्पावधीत पूर्णपणे विकले गेले, ज्यामुळे मंत्राने पुण्याच्या स्पर्धात्मक रिअल इस्टेट क्षेत्रात स्वतःचं स्थान अधिक भक्कम केलं आहे.
झपाट्याने विस्तार होत असतानाही, वेळेवर बांधकाम पूर्ण करणे हे मंत्राचं खास वैशिष्ट्य ठरतं आहे. सर्व चालू प्रकल्प सुस्थितीत सुरु असून, अनेक प्रकल्प पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आहेत — जे ब्रँडच्या विश्वासार्हतेची आणि वेळेच्या वचनबद्धतेची खात्री देतात. मंत्राचे सर्व नवीन प्रकल्प पुण्याच्या सर्वाधिक मागणी असलेल्या भागांमध्ये — खराडी, मुंढवा, मगरपट्टा आणि अपर कोरेगाव पार्क — या ठिकाणी आहेत. हे भाग त्यांच्या उत्तम कनेक्टिव्हिटी, समृद्ध जीवनशैली आणि गुंतवणुकीच्या चांगल्या परताव्यासाठी ओळखले जातात.
मंत्रा केवळ घरे बांधत नाही, तर शहरी जीवनशैलीचा भविष्यकाल घडवत आहे. नव्या आर्थिक वर्षात पाऊल ठेवताना, मंत्रा भविष्यदृष्टी असलेले प्रकल्प उभारण्यास, समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यास आणि टिकाऊ मूल्य निर्माण करण्यास कटिबद्ध आहे.
मंत्रा विषयी: पुण्यात मुख्यालय असलेला मंत्रा हा एक प्रतिष्ठित रिअल इस्टेट ब्रँड असून, ७० वर्षांहून अधिक काळाची कौटुंबिक वारसा लाभलेला आहे. २००७ मध्ये स्थापनेपासून मंत्रा सातत्याने नावीन्य, गुणवत्तेचा आग्रह आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन जपत आहे. वेळेवर प्रकल्प पूर्ण करणे, दर्जेदार बांधकाम आणि ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही कंपनीची मुख्य वैशिष्ट्यं आहेत. मंत्राने आतापर्यंत १८ हून अधिक प्रकल्पांमध्ये ५० लाख चौरस फूट बांधकाम पूर्ण करून, पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये ७५०० हून अधिक कुटुंबांना आपले घर दिलं आहे. स्थिर आर्थिक पाया, गुणवत्ता आणि ग्राहकांच्या विश्वासावर उभारलेली मंत्राची ओळख आज क्षेत्रात आदराने घेतली जाते.