सोनकांबळे दांपत्यानी केले सपत्नीक रक्तदान | ता. प्र. दत्तात्रय सज्जन | धर्माबाद दि.१४: शहरातील रमाई नगर येथे भीम जयंती मंडळाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसह भीम अनुयायी,समाजबांधवांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदान हेच श्रेष्ठ दान मानत रामनगर येथील सामाजिक कार्यकर्ते किरण सोनकांबळे यांनी सपत्नीक रक्तदान केले आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध जयंती मंडळाच्या वतीने अनेक उपक्रम राबवल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने शनिवारी १२ एप्रिल रोजी शहरातील रमाई नगर येथील भीम जयंती मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी अनेक बांधवांनी रक्तदान केले असून सोनकांबळे दांपत्यानी सपत्नीक रक्तदान करत चांगला संदेश दिला आहे. यावेळी भीम जयंती मंडळाचे पदाधिकारी,समाजबांधव व शहरातील तथा तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड