छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी | विजय पाटील | खुलताबाद | लोडिंग पिकअप वाहनाने मोटारसायकलीला धडक दिली. यात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू(Death) झाला, तर त्याची ३० वर्षीय बहीण गंभीर जखमी झाली आहे.(Accident) बहीण-भाऊ नाशिकहून सिल्लोड(Nashik) तालुक्यातील गोळेगावला मामाच्या मुलीच्या लग्नाला जात होते. खुलताबाद शहरातील सराईजवळ नगरपालिका कचरा डेपोसमोर गुरुवारी (१७ एप्रिल) रात्री साडेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडली.(Chhatrapati Sambhajinagar)
समाधान पुंडलिक जाधव (वय २२, रा. बोधेगाव बुद्रूक ता. फुलंब्री) असे मृत्यू झालेल्याचे नाव असून, त्याची बहीण मनीषा देविदास शेलार (वय ३०, हल्ली मुक्काम नाशिक, रा. पळाशी ता. सोयगाव) गंभीर जखमी झाली आहे. खुलताबाद पोलिसांनी सांगितले, की समाधान अविवाहित होता. नाशिकला बहिणीकडे राहत होता. तिथल्याच खासगी हॉस्पिटलमध्ये तो वॉर्ड बॉय म्हणून काम करत होता.
गुरुवारी पहाटे पाचला तो आणि मनीषा मोटारसायकलीने गोळेगावला निघाले. सकाळी साडेसातला खुलताबादला आले. भद्रा मारुतीचे दर्शन घेतल्यानंतर गोळेगावकडे निघाले. सराईजवळ लोडिंग पिकअप (क्र. एमएच २१ एक्स ४९२२) आणि मोटारसायकलची (क्र. एमएच २० जीडब्ल्यू ५१३०) समोरासमोर धडक झाली. यात समाधानचा जागीच मृत्यू झाला. मनीषाला छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. समाधानला दोन बहिणी आहेत. तो एकुलता एक मुलगा होता.