इस्टिमेट शिवाय काम करण्याची पद्धतीवर नागरिक परेशान…
हदगाव प्रतिनिधी | तुषार कांबळे | सार्वजनिक बांधकाम विभागाच्याकडून(PWD) करण्यात येणाऱ्या पुलाच्या बांधकामात चक्क भराव म्हणून माळरानात उपलब्ध होणारे दगड, धोंडे टाकून काम पुर्ण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. (Hadgaon News)या बाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील मौजे तरोडा(Taroda) ते चोरंबा बु. या दरम्यान होणाऱ्या पुलाच्या बांधकामात मोठया प्रमाणात अनियमितता दिसुन येते तरीपण अभियंते यांच्या म्हणण्यानुसार काम अंदाजपत्रकाप्रमानेच होत असल्याची माहिती मिळाली आहे.
या बाबत याचं भागात राहणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार तक्रार निवारण केंद्र ज्याच्या तक्रारीचा टोकण आयडी TAL/PWD/HADG/2025/1 दि.14/03/2025 असा असून या ऑन लाईन पोर्टलवर तक्रार केली असता याबाबत संबंधित अभियंत्यांनी अतिशय तांत्रिक भाषेत उत्तर देत जिल्हाधिकारी नांदेड यांच्या डिजिटल कामास ब्रेक दिल्याची कुजबूज सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती फार वेगळी आहे फक्तं वातानुकूलित खोलीमध्ये बसून आपले सरकार ऑनलाईन तक्रार केंद्रावर थातूरमातूर उत्तर देऊन तक्रार बंद करून हात वर केले.
सदर पुलाच्या बांधकाम करण्यासाठी काँक्रीट टाकण्यासाठी ट्रांनसिट मिक्सर बांधकामाच्या जागी पोहोचण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात भराव टाकून रॅम्प तयार करण्यात आलेला आहे तसेच सद्यस्थितीत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर असून अंदाजपत्रकानुसार काम पूर्ण प्रगतीपथावर आहे सद्यस्थिती सदरचे काम प्रगतीत असून अंदाजपत्रक व मानकाप्रमाणे सदरील काम करण्यात येत आहे अशी प्रतिक्रिया ऑन लाईन पोर्टलवर दिली आहे.
सुरुवातील बाजूच्या नाल्यातील दगड धोंडे टाकून भराव टाकला पण तक्रार झाली म्हणूण आता काही दिवसांनी मात्र डोंगर माथ्यावरील मिळणारे दगड धोंडे टाकून झालेल्या चुकीच्या कामावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे पण त्यात ही अनियमित कामाची पितळ उघडे पडताना दिसत आहे.