Unseasonal Rain | रायगड जिल्ह्याच्या (Raigad News) अनेक भागात आज संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. अलिबागसह पेण, खोपोली, उरण , पनवेल भागात जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाने नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
ADVERTISEMENT
पावसामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला. अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.