• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Monday, May 4, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Monsoon Update: खुशखबर! अवघ्या 2 दिवसांत मान्सून केरळमध्ये

Satyaprabha News by Satyaprabha News
23 May 2025
in महाराष्ट्र, Top News, पुणे, मुंबई
Mansson Update
32
SHARES
212
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

Monsoon Update | Satyaprabha News | नैऋत्य ‘मॉन्सून’ (Mansoon)केरळमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. दरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्यालगत असलेल्या मध्य, पूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, ते सध्या स्थिर आहे. या दरम्यान महाराष्ट्रातील कोकण(Konkan), गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.

रायगड, रत्नागिरीमध्ये आज (शुक्रवारी ता. 23) मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या दोन्ही जिल्ह्यांना ‘रेड’ अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी विजांचा कटकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वातावरण अनुकूल नैऋत्य मॉन्सून अरबी समुद्राच्या दक्षिण भागातील काही उर्वरित भागांमध्ये, मालदीव आणि कोमोरॉन क्षेत्राच्या उर्वरित भागांमध्ये, लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक, तमिळनाडूच्या काही भागांमध्ये, तसेच दक्षिण-मध्य बंगालचा उपसागर, उत्तर बंगालचा उपसागर आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही भागांमध्ये पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे.

25 मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये काही भागात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुंबईत पावसाचा जोर कमी राहणार असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत मान्सून केरळात दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. 25 मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबईत साधारण 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

पूर्व-मध्य अरबी समुद्रात, कर्नाटकच्या किनाऱ्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र 23 मेच्या संध्याकाळपर्यंत तीव्र होऊन अवदाबमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावामुळे कोकण (मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी), मध्य महाराष्ट्र (पुणे, सातारा, सोलापूर), मराठवाडा (बीड, परभणी, नांदेड) आणि विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईला ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान विभागाने 22 ते 24 मे दरम्यान कोकण, गोवा आणि पश्चिम किनारपट्टीसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः मुंबई आणि परिसरात 23 मे रोजी संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे जलमय परिस्थिती आणि वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते. मुंबई महानगर प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट दिला गेला आहे.

रायगड-रत्नागिरीत पावसाचा रेड अलर्ट
आज, दिनांक 23 मे रोजी कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच, पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तसेच नाशिक, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील उर्वरित भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला असून, हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट जारी केला आहे.

Tags: Kerala NewsMansoon Updatemonsoonmonsoon fashionmonsoon recipesmonsoon travelrain photographyrainy day inspirationrainy seasonSatyaprabha Newsweather
Previous Post

सीसीटीव्हीच्या नजर कैदेतून पकडलेला अवैध रेतीचा टिप्पर रात्रीतून गायब….

Next Post

मित्रनगरात घाणीचे साम्राज्य ; नागरीक हैराण

Next Post
image editor output image95518720 1748094163895

मित्रनगरात घाणीचे साम्राज्य ; नागरीक हैराण

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Trupti Desai: पीडितांना न्याय मिळत नसेल तर खरोखरच आरोपी जनतेच्या ताब्यात द्या...#truptidesai #nasrapur #childabuse #politicalmaharashtra  #SatyaprabhaNews
  • Sushma Andhare: आपण एका असुरक्षित राज्यात आहोत...
.
#sushmaandhare #devendrafadnavis #SatyaprabhaNews  #nasrapurcrime #childabuse politicalmaharashtra
  • Rupali Patil: त्या माणसाचं लिं** कापलं पाहिजे | Satyaprabha News
.
#rupalipatil #rupalithombre #nasrapurcrime #SatyaprabhaNews #childabuse politicalmaharashtra
  • लोकांना घराबाहेर पडू न देणं हे त्या काळात मोठं आव्हान होतं. जर मुख्यमंत्री बाहेर पडले असते, तर जनता बाहेर पडली असती आणि माणसांचे बळी गेले असते. हे या लोकांना कळत नाही. : संजय राऊत
.
#SanjayRaut #Shivsena #SatyaprabhaNews
  • ही घटना काल रात्री ऐकल्यानंतर मन बधिर झाल. जोपर्यंत या विकृतीला एक दहशत बसत नाही, तोपर्यंत आपली लेकरं-बाळ सुरक्षित राहू शकत नाहीत. आमच्यासारख्यांवर केसेस झाल्या तरी चालेल; आम्ही असेही आंदोलनामध्ये केसेस घेतो. या नराधमाचं लिंग कापलं पाहिजे.: — रुपाली ठोंबरे
.
#RupaliThombare #SatyaprabhaNews #NCP #PuneNews #Crime
  • पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावची ही घटना केवळ गुन्हा नाही… ती आपल्या समाजाच्या विवेकाला हादरवणारी वेदना आहे.
त्या ४ वर्षांच्या चिमुकलीसाठी न्याय हीच खरी लढाई… आणि ती शेवटपर्यंत लढली जाईल.
राजकारण नव्हे, मानवता जिंकली पाहिजे.आमदार चित्रा किशोर वाघ*
भाजपा,महिला प्रदेशाध्यक्ष
.
#ChitraWagh #BJP #LatestNews #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10426
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8162
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

4599
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026

Recent News

IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज