नांदेड दि.२७ : भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या रुपाने मिळविलेल्या ऐतिहासिक विजयाबदल कृतज्ञता व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतिने आज बुधवार रोजी जय जवान जय किसान तिरंगा महारॅली आयोजित करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह इतर मान्यवर रॅलीत सहभागी होणार आहेत. सकाळी दहा वाजता पक्ष कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान ही रँली असणार आहे, अशी माहिती खा. रविंद्र चव्हाण यांच्यासह, जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
पहलगाम घटनेला प्रतिउत्तर देते भारतीय सैनिकांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी किसान सन्मानाची जोड देत नांदेड काँग्रेसच्या वतीने आज बुधवार, रोजी जय जवान जय किसान रॅली आयोजित करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश सहप्रभारी कुणाल चौधरी, माजी मंत्री अमित देशमुख, खा. डॉ. शिवाजी काळगे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, नांदेड जिल्हा काँग्रेस निरिक्षक तुकाराम रेंगे पाटील आदी मान्यवर मंडळी या रॅलीत सहभागी होणार आहेत. सकाळी दहा वाजता, नवा मोंढा काँग्रेस पक्ष कार्यालय येथील रॅलीला सुरुवात होईल. आयटीआय, शिवाजीनगर, एसपी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्ग महात्मा गांधी पुतळा येथे समारोप होईल. यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी हजारोंच्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते रॅलीत सहभागी होणार आहेत. अशी माहिती खा. रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड