
हिमायतनगर प्रतिनिधी/- तालुक्यात होत असलेल्या अवैध रेती व मुरुम उत्खननाची गोपनीय माहिती मिळताच हिमायतनगर महसूल पथकाने दिनांक 14 फेब्रुवारी च्या रात्री अज्ञात ठिकाणी सापळा रचून मोजे हिमायतनगर परीसरात अवैध मुरूम वाहतूक करत असताना दोन ट्रॅक्टर आढळताच त्यांना पकडून हिमायतनगर तहसील कार्यालय येथे लावून त्यांच्यावर कारवाई केली व संबंधित घटनास्थळी जेसीबी व पोकलेन आढळून आल्याने त्याची चौकशी करण्यासाठी संबंधित जेसीबी पोलीस पाटील यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पथक प्रमुख मंडळाधिकारी चव्हाण व हिमायतनगर सज्जाचे तलाठी जावरकर यांनी दिली आहे..
हिमायतनगर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथील माफियांकडून मागील काही दिवसांपासून राजरोसपणे मुरुम उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू होते यासाठी हिमायतनगर येथील महसूल प्रशासनाने अवैध रेतीमाफीयांच्या विरोधात पथकाची नेमणूक केली आहे त्या पथकामध्ये विविध अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे शहरात विविध ठिकाणाहून होत असलेली अवैध गोन खणीज व रेती ची वाहतूक करणाऱ्यांची महसूल प्रशासनाकडून तपासणी करून त्यांच्या रॉयल्टी चे परवाने आहेत का हे तपासण्याची मोहीम महसूल प्रशासनाने सुरू केली आहे जो कोणी अवैध मुरूम व रेती वाहतूक करत असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश महसूल प्रशासनाने दिले आहे अशीच गोपनीय माहिती हिमायतनगर येथील महसूल प्रशासनास मिळतात त्यांनी हिमायतनगर परिसरात दिनांक 14 फेब्रुवारी रोजी अवैध गोण खनिज करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर धडक कारवाई करून तहसील कार्यालय येथे लावले व ज्या ठिकाणावरून हे अवैध गुण खनिजाचे उत्खनन पोकलेन व जेसीबी द्वारे होत होते त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता अवैध गोण उत्खनन करणाऱ्या माफीयांनी तेथून पळ काढला त्या ठिकाणी असलेल्या जेसीबीची चौकशी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तो जेसीबी पोलीस पाटलांच्या ताब्यात देऊन पोलीस पंचनामा करत दोन ट्रॅक्टर वर कारवाई केली असल्याची माहिती त्या पथकातील मंडळ अधिकारी चव्हाण ,तलाठी जावरकर व वाहन चालक आकाश बारकुल यांनी दिली आहे या कारवाई मुळे शहरातील अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे