नांदेड दि.३ जून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने, सायन्स महाविद्यालयातील प्राणीशास्त्र व मत्स्यशास्त्र विज्ञान संशोधन केंद्रातील अजय शिवलिंगराव हिवरे यांना नुकतीच प्राणीशास्त्र विषयात विद्यावाचस्पती (पीएच.डी.) प्रदान केली आहे. त्यांनी “बायोलॉजी ऑफ नोटोपटेरस चिताळा (हॅमिल्टन, १८२२) फॉम नांदेड रिजन महाराष्ट्र” या विषयावर शोधप्रबंध विद्यापीठात सादर केला होता. यासाठी त्यांनी विभागप्रमुख डॉ. किरण शिल्लेवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा शोधप्रबंध पुर्ण केला. तसेच आजपर्यंत त्यांचे (08) शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झालेले आहेत. सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. एल. पी. शिंदे, उप प्राचार्या डॉ. अरुणा शुक्ला, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य ई. एम खिल्लारे आणि शिक्षकेत्तर वर्ग व मित्रपरिवाराने अभिनंदन केले.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!