बोगस काम केलं पळशीकरांन गण्याची जिल्हा भर चर्चा
हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव येथे निकृष्ट काम केल्याबद्दल येथील ग्रामस्थांनी चक्क सोशल मीडियावर गाणे गाऊन कामाची केली प्रशंश ह्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित निकृष्ट दर्जाचे होत असलेले काम तात्काळ थांबून गुत्तेदारास काळ्या यादीत टाकण्याची ग्रामस्थांची मागणी
नागेश शिंदे
हिमायतनगर दि.१२: हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव हे पुनर्वसित गाव असल्यामुळे ह्या गावात लोककल्याणकारी योजनेमार्फत पुनर्वसित गाव म्हणून लाखो रुपयांचा निधी शासनाने मंजूर करून दिला आहे ह्या गावातील सर्व कामे निकृष्ट दर्जाचे करून गावातील नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेक करत निकृष्ट कामे थातूरमातूर पद्धतीने करून शासनाचा लाखो रुपयांचा निधी हडप करण्याचा प्रकार येथील शासकीय गुत्तेदाराकडून होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यातील पुनर्वशीत गाव म्हणून शासनाच्या पटलावर मंजूर झालेले मोजे आंदेगाव या गावाच्या विकासासाठी शासनाने लाखो रुपयांचा निधी मंजूर करून गावातील रस्ते नाली व पुलाचे बांधकाम करून येथील नागरिकांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला पण ही सर्व कामे करणारे शासकीय गुत्तेदार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून येथे निकृष्ट दर्जाची कामे करून शासनाच्या डोळ्यात धुळफेक करत थातूरमातूर पद्धतीचे कामे करून लाखो रुपयांचा निधी हडप करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत कोणाचा आरोप गावातून मोठ्या प्रमाणात होत आहे व अशा तक्रार देखील ग्रामस्थांनी वारंवार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्याकडे केली पण त्यांच्याकडून ह्याची कुठल्याही प्रकारे दखल होत नाही त्यामुळे संत्रप्त झालेल्या येथील एका ग्रामस्थांनी चक्क सोशल मीडियावर गाणे गाऊन ह्या निकृष्ट कामाबद्दल व्हिडिओ व्हायरल केला आहे या व्हिडिओची चर्चा संपूर्ण तालुका भर होत असल्यामुळे आता तरी जिल्हा प्रशासन या कामाकडे लक्ष देणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे पुनर्वसित गावाच्या कामाकडे लक्ष देण्यासाठी कोणी वाली आहे की नाही ह्या संदर्भात
अनेक वेळेस येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या तरीपण कुठल्याही प्रकारची कामात सुधारणा होत नाही व त्यांच्यावर कारवाई केली जात नाही त्यामुळे आज दि 12 एप्रिल रोजी चक्क गाणे गाऊन सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकल्यामुळे त्या व्हिडिओची चर्चा संपूर्ण तालुका भर गाजत आहे या निकृष्ट कामाकडे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे या ग्रामस्थांना हे पाऊल उचलावे लागले असल्याचे येथील शिवसेना शाखा प्रमुख परमेश्वर यमलवार यांनी सांगितले त्यामुळे आता तरी माननीय जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी या पुनर्वसित गावाच्या कामाकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे..
बोगस काम केलं पळशीकरांना गण्याची तालुका भर चर्चा
हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव येथे बोगस काम केलं पळशीकरांना या गाण्याची चर्चा संपूर्ण तालुका भर गाजत आहे ह्याची आता तरी प्रशासनाने दखल घेऊन या सत्य परिस्थितीची दखल घेऊन पुनर्वशीत गावाला न्याय मिळून देण्यासाठी योग्य ती पावले उचलावी अशी अपेक्षा येथील ग्रामस्थांना आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड