Bank Holiday Monday 21 April 2025: सोमवारी 21 एप्रिल रोजी देशातील काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील. म्हणजेच ग्राहक सोमवारी बँकेत जाऊन त्यांचे काम करू शकणार नाहीत. आरबीआयने (भारतीय रिझर्व्ह बँक) जाहीर केलेल्या सुट्टीच्या (RBI Bank Holiday) यादीत ‘गरिया पूजा’ ही त्रिपुरा राज्यासाठी स्थानिक सुट्टी म्हणून नमूद केली आहे. त्रिपुरा राज्यातील त्रिपुरातील स्थानिक सणांमुळे सोमवारी 21 एप्रिल रोजी बँका बंद राहणार आहेत. त्रिपुरा वगळता सर्व राज्यांमध्ये बँका खुल्या राहतील.
‘गरिया पूजा’ ही त्रिपुरा राज्यासाठी स्थानिक सुट्टी आहे. त्यामुळे ही सुट्टी महाराष्ट्रात लागू नसेल. महाराष्ट्रासह इतर राज्यांतील बँका या दिवशी नेहमीप्रमाणे सुरू राहतील. तुम्ही महाराष्ट्रात असाल तर सोमवारी बँका नेहमीप्रमाणे सुरू असतील. परंतु त्रिपुरा राज्यात या दिवशी बँक खुल्या नसतील. बँक शाखा बंद असल्या तरी, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय आणि एटीएम सेवा सुरू राहतील. ग्राहक ऑनलाइन पैसे पाठवू शकतात, बिल भरू शकतात आणि इतर डिजिटल बँकिंग कामे करू शकतात.
गरिया पूजा हा त्रिपुरा राज्यातील एक पारंपारिक आणि लोकप्रिय सण आहे. विशेषतः आदिवासी समुदाय मोठ्या भक्ती आणि उत्साहाने हा सण साजरा करतो. ही पूजा दरवर्षी वैशाख महिन्यात केली जाते आणि ती देवी गरियाला समर्पित असते. गरिया देवीला समृद्धी, कापणी आणि आनंदाची देवी मानले जाते. या दिवशी पूजेत बांबू, फुले, चिकन आणि दारू यासारख्या वस्तू अर्पण केल्या जातात.
एप्रिल 2025 मध्ये कधी बंद राहतील बँका?
21 एप्रिल 2025(सोमवार): त्रिपुरामध्ये बँका बंद राहतील. या दिवशी आदिवासींचा सण असलेल्या गरिया पूजाचा उत्सव साजरा केला जाईल.
26 एप्रिल 2025 : चौथा शनिवारची सुट्टी
27 एप्रिल 2025: रविवार, साप्ताहिक सुट्टी
29 एप्रिल 2025 (मंगळवार) : हिमाचल प्रदेशात भगवान परशुराम जयंती साजरी केली जाणार असल्याने बँका बंद राहतील.
30 एप्रिल 2025 (बुधवार) : कर्नाटकात बसव जयंती आणि अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार असल्याने बँका बंद राहतील.