हिमायतनगर नगरपंचायत मध्ये नाभिक समाजाच्या महिलेला मिळाले प्रतिनिधित्व…
हिमायतनगर प्रतिनिधी/- महाराष्ट्र नाभिक महामंडळ तालुका अध्यक्ष तथा भाजपा तालुका अध्यक्ष गजानन चायल यांच्या नेतृत्वात आताच झालेल्या हिमायतनगर नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीत वार्ड क्र 1 मधून त्यांच्या वाहिनी तथा नाभिक समाजाच्या महिला सौ. दर्शना शरद चायल यांची प्रचंड मतांनी निवड होऊन त्या निवडून आल्या त्या बद्दल आज दि 3 जानेवारी रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे ओचित्य साधून नवनिर्वाचित नगरसेविका सौ दर्शना चायल यांची आज सर्व नाभिक समाज बांधवानी त्यांच्या निवास स्थानी भेट देऊन त्यांचा सत्कार केला व त्याना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या….
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक ही मोठी चुरशीची झाल्याचे पाहायला मिळाली या निवडणुकीमध्ये शहरातील मतदारांनी इतर मागासवर्गीय नागरिकांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणत बहुसंख्य उमेदवार या निवडणुकीत निवडून दिले त्यामध्ये शहरातील वार्ड क्रमांक एक मधून नाभिक समाजाच्या महिला सौ.दर्शना शरद चायल या भारतीय जनता पार्टी कडून अधिकृत उमेदवार होत्या त्यांना या प्रभागातील जनतेने मोठे मताधिक्य देऊन प्रचंड बहुमताने निवडून दिले त्यांच्या या विजयाची चर्चा हिमायतनगर शहरासह तालुक्यात झाली या विजया मागे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष तथा महाराष्ट्र नाभिक महामंडळ तालुका अध्यक्ष गजानन चायल यांचा सिंहाचा वाटा होता त्यामुळे हिमायतनगर महाराष्ट्र नाभिक महामंडळ तालुका शाखेच्या वतीने आज दिनांक 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरातील सर्व समाज बांधवांनी नवनिर्वाचित नगरसेविका सौ दर्शनाताई शरद चायल व तालुका अध्यक्ष गजानन चायल यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करत त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट देत त्यांचा सत्कार केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या….. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप शिंदे, दिलीप कोंडामंगल सर,सचिन कळसे सर,नरसय्या अण्णा गंधम, व्यंकटी गंधम, प्रकाश घुंगरे, रमेश लिंगमपल्ले, लक्ष्मण मोतेवार , बाबुराव सोळंके , सुभाष राचटकर, चंद्रकांत कळसे, आनंदराव गायकवाड, श्रीकांत घुंगरे,तालुका उपाध्यक्ष नागेश शिंदे, गणेश वाघबरे, पप्पू सोळंके,रवी जोनापल्ले,मारोति जोनापल्ले,राजू सूरजवाड,अवधूत गायकवाड, अंकुश शिंदे,सह आदी नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते