
हिमायतनगर प्रतिनिधी /-निवडणुकीत कार्यकर्ता हा विजयाचा शिलेदार असतो परंतु कार्यकर्ता देखील रोजगार भिमुख व सक्षम असेल तर आपोआपच पक्ष कार्याला बळकटी येते. त्यामुळे कार्यकर्ता सक्षमीकरणासाठी आपण आगामी काळात प्रयत्न करणार कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवणार असे प्रतिपादन भाजप नेते डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी केले.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील माहूर येथे आयोजित बूथ प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राजू मुडाणकर, अपील बेलखोडे, निर्मलाताई जोशी, अर्चना दराडे, पद्माताई गीते, स्वाती आडे, सतीश राठोड, विनायक मुबळे, कांतराव घोडेकर, अनिल वाघमारे, शुभम ठाकूर, विजय आमले, संजय शेंडाळे, राजू दराडे, नंदकुमार जोशी, अश्विन नाईक, दिनेश पवार, लक्ष्मण पवार, आणि आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत पुढे बोलताना लोकसभा संयोजक डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे प्रत्येक बूथचे नियोजन काटेकोरपणे करत आपला उमेदवार कसा प्रभावी असेल यासाठी मायक्रो प्लानिंग करण्याच्या सूचना दिल्या. केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण योजनांचा लाभ जनतेपर्यंत कितपत पोहोचला याबाबत जनजागृती करत नवीन मतदारांवर आपले लक्ष केंद्रित करून नूतन मतदारांच्या बैठका घ्या त्यांचे प्रश्न जाणून घ्या, प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्या असे आवाहन करत कार्यकर्त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेऊन कार्यकर्त्यांना रोजगार उपलब्ध करून दिल्यास हे कार्यकर्ते सक्षम होतील या दृष्टीने आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कार्यकर्त्यांनी समन्वयकाची भूमिका करावी. बुथप्रमुख व सर्व शक्ती प्रमुखांनी पुढाकार घेऊन आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने भाजपने नेते श्रीकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
चौकटीतील मजकूर
श्रीकांत पाटील यांच्या कार्याने कार्यकर्ते प्रभावित
निवडणुका येतात आणि जातात परंतु कार्यकर्त्याच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेणारा नेता पहिल्यांदाच पाहिला. प्रचार ऐवजी श्रीकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून बैठकीतील उपस्थित युवक तरुण प्रभावित झाले, मध्यप्रदेशातील नेता आपल्या जन्मभूमीकडे येतो आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतो. असा नेताच हिंगोली लोकसभेतून खासदार म्हणून गेला पाहिजे असा मनोगत व्यक्त करीत या त्यांच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी तरुण व युवकांची फळी उभारण्याचा निश्चय यावेळी तरुणांनी बैठकीनंतर केला.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड