नांदेड दि.२५: बोले सो निहाल सत श्री अकालच्या घोषणांनी नांदेड शहर दुमदुमले. दरवर्षीप्रमाणे सचखंड श्री. हजुरसाहिब येथून निघालेली यात्रा महाविर चौकात हल्लाबोल या प्रकारानंतर समाप्त झाली.
दशम पातशाह श्री. गुरूगोविंदसिंघजी महाराजांच्या या पवित्रस्थळी दरवर्षी देश व विदेशातून हजारोंच्या संख्येने सिख अनुयायी येतात. नवरात्रीच्या 10 दिवसांमध्ये वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. अनेक जण आपल्यावतीने या दहा दिवसांमध्ये वेगळ्या लंगरची (भोजनाची) सोय करतात. विविध भागातून आलेले विविध सिख अनुयायी आप-आपल्या परिने या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत असतात. दसरा महोत्सवात बाहेरुन येणाऱ्या संत मंडळींची मोठी संख्य असते. त्यांच्यासोबत त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येत असतात.

आज दुपारी 3 वाजता श्री पंचप्यारे साहिबान यांनी अरदास(प्रार्थना) करून शोभा यात्रेची सुरूवात केली. यात निशाण साहिब घेवून अनेक जण सहभागी झाले. भाविकांनी जागो-जागी त्यांची आरती केली. ही यात्रा हळुहळु पुढे चालत होती. यामध्ये अनेक युवक, बालक आपले गतगा (शस्त्रविद्या) प्रदर्शन करत होते. हळुहळू ही यात्रा महाविर चौकात पोहचली सचखंड श्री हजुर साहिबजीचे जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी सुध्दा या यात्रेत महाविर चौकापर्यंत सहभागी झाले होते. सायंकाळी 6 वाजता अरदास (प्रार्थना) करण्यात आली आणि तेरे बाणे सरबतदा भला या घोषणेसह प्रतिकात्मक हल्ला बोल झाला. यानंतर ही मिरवणूक बाफना टी पॉईंट, जुना मोंढा आणि परत सचखंड श्री हजुर साहिबजी येथे पोहचते.

पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या नेतृत्वात पोलीस दलातील असंख्य अधिकारी आणि असंख्य पोलीस अंमलदार, गृहरक्षक दलाचे जवान यांनी मेहनत घेवून कोणत्याही धार्मिक कार्यक्रम अशांतता होणार नाही यासाठी भरपूर मेहनत घेतली.
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड













