
हिमायतनगर प्रतिनिधी/- शहरातील देव कृपा गो शाळेस दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी उमरी येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन उमरी येथे एक आयचर टेम्पो कत्तलीसाठी प्राणी घेऊन येत असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री झुंजारे साहेब यांनी गांभीर्याने दखल घेत तातडीने सदरील वाहन पकडले ज्यामध्ये 19 म्हशी ज्या अतिशय क्रूरपणे चारी पाय बांधलेले आणि शिंगदेखील वर धरून बांधलेले अतिशय दाटीवाटीने भरलेल्या होत्या , यापैकी बहुतांशी म्हशी जखमी अवस्थेत आढळुन आल्याने गुरनं. 30/2024 नोंद करून सदरील सर्व पशु देवकृपा गोशाळा तथा गोविज्ञान केंद्र, पवना, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड येथे संगोपनासाठी पाठवले होते.

या प्रकरणातील म्हशी आणि आयचर टेम्पो परत मिळावा यासाठी शेख अहेमद शेख अली रा. निर्मल यांनी सदरील म्हशी हे कत्तलीसाठी नेत नसुन शेतीच्या कामासाठी नेत असल्याचे ऊमरी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात नमूद केले होते, त्यामुळे मा. न्यायालयाने सदरचे पशु आमच्या ताब्यात द्यावे याकरिता दावा दाखल केला होता सदरील प्रकरणात देवकृपा गोशाळेच्या वतीने या दाव्यावर आक्षेप घेऊन हे सर्व म्हशी नांदेड येथे कत्तलीसाठी नेत आहेत कारण शेतीसाठी कोणताही शेतकरी किंवा शेतीसाठी खरेदी विक्री करणारा व्यापारी अशाप्रकारे अत्यंत क्रुरपणे, दाटीवाटीने, निर्दयीपणे ईजा होईल अशा पद्धतीने नेतच नाही. म्हणुनच आपण संबंधित अर्जदार मा न्यायालयाची दिशाभुल करून पशु कत्तलीसाठी देण्याची दाट शक्यता आहे, म्हणुन संबंधित अर्जदाराचे दोन्ही अर्ज रद्द करावे. अशी विनंती केली होती ते विनंती मान्य करून संबंधित पशु गोशाळेच्या ताब्यात ठेवावे अशी गोशाळेच्या वतीने विनंती ॲड जगदीशजी हाके सर, ॲड राखे सर सर यांनी भक्कमपणे न्यायालयापुढे मांडली होती ते विनंती मा न्यायिलयाने मान्य केली आहे. ॲड चिकटवाड यांनी देखील या प्रकरणी सहकार्य केले आहे त्यामुळे या गोशाळेचे संचालक किरण सुभाष बिच्चेवार यांनी नांदेड जिल्ह्यातील बहुतांशी प्रकणात विविध न्यायालयाने देवकृपा गोशाळेच्या बाजुनेच निर्णय दिले आहेत असे सांगितले