सातर दि.१९: नागठाणे येथे सरकारी शाळे मधील अल्पवयीन विद्यार्थावर शिक्षिकेच्या संशयावरून भा. द. स. ३५४ ड व ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करीत सदरिल गुन्हा अल्पवयीन मुलाने केल्याचे निष्पन्न झाले आहे असे म्हणून बोरगाव पोलीस अधिकारी यांनी अल्पवयीन बालकाला कायदेशीर नोटिस पाठविण्यात आली आहे. तसेच यामध्ये सदर विद्यार्थ्याला आरोपी असल्यासारखे वर्तणूक करून त्याच्या मूलभूत बाल अधिकार व संविधानिक हक्काचे उल्लंघन करण्यात आलेले आहेत. एखादी घटना घडली तर त्याची शहानिशा करून त्याबाबत योग्य प्रक्रिया होणे अपेक्षित असताना आणि कोणताही ठोस पुरावा नसताना याच विद्यार्थ्याला शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक यांनी जातीय, धार्मिक मानसिकतेमधून आणि पूर्वग्रह दूषित विचाराने आरोपी असल्याचे दाखविले आहे. मात्र ही सर्व बाल अधिकार व पोकसो कायदा अंतर्गत दिलेल्या हक्काचे व सांविधानिक अधिकाराचे उलंघन करणारी कृती आहे.
जर एखाद्या विद्यार्थ्यांकडून चुकीची किंवा अव्यवहार्य घटना घडली असेल तर त्याच्या पालक आई-वडील यांना बैठक घेवून संवाद साधून विद्यार्थाच्या वर्तणूकीमध्ये योग्य सुधारणेबाबत मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सांगणे गरजेचे होते मात्र असे न होता थेट शिक्षिकानेच पोलिसांच्या हवाले विद्यार्थ्याला करणे कितपत योग्य आहे. तसेच यामध्ये नांगठाणे पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी पोलीस वर्दी मध्ये शाळेत येवून पोलीस गाडी मध्ये विद्यार्थालां शाळेच्या परिसरां मधून थेट पोलीस स्टेशनलां घेवून गेले आणि दिवसभर एकट्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये बसवुन त्याच्यावर दबाव निर्माण करून गुन्हेगार असल्यासारखे वागणूक दिली या सर्वच घटनेमध्ये बाल हक्काचे स्पष्ट उलंघन झालेले आहे.
सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले. विद्यार्थ्यावर जातीय धार्मिक मानसिकते मधून वर्तनुक केल्या प्रकरणी तसेच बालकास सराईत गुन्हेगारसारखी वागणूक दिली व त्याच्या बाल हक्क
संरक्षणाचे उल्लंघन केले प्रकरणी तात्काळ नागठाणे सरकारी शाळेमधील मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक, तक्रारदार शिक्षक व सहशिक्षक यां सर्वाना तत्काळ कायदेशीर कारवाई करून बडतर्फ करा अन्यथा येत्या चार दिवसात आम्हाला पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल असा इशारा वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याचे युवा नेते गणेश वाघमारे यांनी दिला.यावेळी पीडित विद्यार्थी व त्याचे कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते तसेच जिल्हा उपाध्यक्ष बबनराव करडे ,संदिप कांबळे , हाजी मो.हुसेन पालकर , जिल्हा संघटक रवींद्र वायदंडे , जिल्हा सचिव दीपक चव्हाण , शशिकांत गंगावणे, सातारा तालुकाअध्यक्ष दत्तात्रय सावंत , उमेश खंडूजोडे, अनिल बेडकर, सुदर्शन मोहिते, सतीश कांबळे, तोहिद खाटिक, युवा नेते प्रशांत कीर्तीकुडाव , अमन मुलाणी , सुदर्शन मोहिते , अनिल बडेकर , तोहिद खाटीक , महेश कीर्तीकुडाव यांच्यासहित पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड