भोकर दि.३ :येथील तालुक्यातील नांदा (म्है.प.) पाळज येथील प्रसिद्ध गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन परत जाणाऱ्या भाविकांच्या कारला ट्रकची जोरदार धडक बसून तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना नांदा (म्है.प.) येथील शाळेजवळ बुधवारी (दि. ३ सप्टेंबर) रोजी घडली.
या अपघातामागे रस्त्याचे निकृष्ट व अर्धवट काम असल्याचा आरोप होत असून, संबंधित ठेकेदार निखील कन्स्ट्रक्शनच्या बोगस कामामुळेच हा अपघात घडल्याचा स्थानिक नागरिकांचा आक्रोश आहे प्राप्त माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील फुल्ली राजु चेकनुरी (मंडल वरणी), सुनीता चेकनुरी (हुंगणापूर), व वाणी (बोधन) हे तिघे ब्रेझा कारने पाळज येथील दर्शनानंतर परत जात होते. नांदा (म्है.प.) येथे शाळेजवळ उभ्या ट्रकला रस्त्यावरील खड्डे आणि अपूर्ण कामामुळे कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तिघेही जागीच ठार झाले.स्थानिक नागरिकांनी प्रशासन व संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीवर संताप व्यक्त केला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.पोलिस तपास सुरू असून, या अपघाताचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई होईल, का अशी मागणी नागरीक करित आहेत अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!