तुषार कांबळे | हदगाव प्रतिनिधी | हदगाव तालुका(Hadgaon News) भाजपाचे शहर अध्यक्ष बाला पाटील(Bala Patil) या पदाधिकाऱ्याने १९ वर्षीय विद्यार्थिनीची छेडछाड करून जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याची(BJP Hadgaon) घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, महिला फिर्यादीने २७एप्रिल २०२५ रोजी दुपारी चारच्या सुमारास हदगाव येथे आपल्या मैत्रिणीबरोबर आल्या होत्या. दरम्यान, टेलिफोन ऑफिसजवळ त्या थांबल्या असता, आरोपी बाला पाटील (भाजपा शहराध्यक्ष, हदगाव) यांनी मोटरसायकलवरून येऊन जबरदस्तीने त्यांच्या गाडीवर बसण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने विरोध केल्यावर आरोपीने जातीवाचक शब्दांचा वापर करत महारा मागांच्या पोरी ५०० रुपयांत झो****तात, तुलाही झो**प***वतो असे अपमानास्पद वक्तव्य केले आणि पुन्हा हदगावमध्ये दिसल्यास अपहरण करण्याची धमकी दिली.
ही घटना घडताच फिर्यादीने आपल्या मैत्रिणीकडे जाऊन तात्काळ हदगाव पोलीस(Hadgaon Police) ठाण्यात तक्रार दिली. फिर्यादीने आरोपीला फोटोवरूनही ओळखले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७४ (जातीवाचक अपमान), 75(1) (ii) d 75(1) (iv) (धमकी), ३५२ (शारीरिक जिव्हाळ्याचा छळ), ३५१ (२) व ३५१(३) (छेडछाड), तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलम 3(1) (J), 3(1)(g), 3(1)(w) (i), व 3(1)(w)(ii) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ऋखठ क्रमांक ०१३३, दिनांक २७/०४/२०२५ रोजी रात्री ९.१८ वाजता दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी व हदगाव पोलीस करीत आहेत.













