तुषार कांबळे | हदगाव प्रतिनिधी |हदगाव शहरातील
राठी चौक येथे भर दिवसा अवैध रेतीची वाहतूक करणारे टिपर पकडून महसूल पथकाने तहसील कार्यालयात पंचनामा करून पुढील दंडात्मक कारवाईसाठी जमा केले असताना १९ मे च्या मध्यरात्री ते टिप्पर पळवून नेले असल्याची तक्रार पोलीस स्टेशन हदगाव येथे देण्यात आली. चक्क तहसील कार्यालयातून अवैध रेतीची वाहतूक करणारे वाहन पळवुन नेण्यात आल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
तलाठी व मंडळ अधिकारी यांनी हदगाव शहरात एक रेतीचा टिप्पर पकडला होता मात्र रेती माफियाने सीसीटीव्हीच्या नजरेत असताना तहसील कार्यालयाच्या आवारातून तो टिप्पर पळविला असल्याचे निदर्शनास दिसून आल्याने चर्चेचा विषय झाली आहे.
याबाबत हदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मंडल अधिकारी विजय महाजन व तलाठी हसनाबादे शासकीय कामानिमित शहरात फिरत असताना राठी चौकात अवैध वाळूचा भरलेला टिप्पर क्र ३० ४६७६ आढळून आला. चालकांकडे आवश्यक
ती कागदपत्रे नसल्याने टिपर मधील अवैध वाळूचा पंचनामा करून सदर वाहन तहसील कार्यालयांमध्ये जमा केले होते परंतु दि. २० मे रोजी सकाळी पाच साडेपाच दरम्यान तहसील परिसरातून तो टिप्पर गायब झाला आहे.
विशेष म्हणजे तहसील कार्यालयाच्यावर सीसीटीव्ही असताना व तहसिल आवारात दोन्ही बाजूला लोखंडी गेट असतांना अवैध रेतीचा टिप्पर पळवण्यात आल्याने तहसील प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

## सत्यप्रभा न्यूज नांदेड ##