Devendra Fadnavis Captain Ashok Kharat Arrest: भोंदू कॅप्टन अशोक खरातला महिलेवरील अत्याचार प्रकरणी नाशिकच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. यानंतर त्याचे अनेक कारनामे आता उघड होऊ लागले आहेत. पोलिसांना त्याच्या कार्यालयात 58 आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले असून, यामध्ये नेमकं काय आहे तपासानंतर उघड होईल.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 आठवड्यापुर्वीच संबंधित प्रकरणात लक्ष घातलं होतं. मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांशी बोलून यासंदर्भात कारवाईचे आदेश दिले होते. संबंधित प्रकरणांचं गांभीर्य ओळखून खरातवर शक्य ती कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिल्याचं आता समोर आलं आहे.