नांदेड दि. १४: सहयोग सेवाभावी संस्था संचलित इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलीटेक्निक महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या वतीने सलग आठ तास वाचन उपक्रम, प्रश्नमंजुषा, पोस्टर मेकिंग,इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे सचिव डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ईशान अग्रवाल, प्राचार्य शिवानंद बारसे, रिजिस्ट्रार शंकर किरकाण,सर्व विभाग प्रमुख,संयोजक समितीतील प्रा. जोंधळे प्रा. थूल,प्रा. गुरप्रीत सिंग व इतर शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी वैभव निलेवाड, श्रेया गोवंदे व इतर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
विविध स्पर्धातील विद्यार्थ्यांना प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक व प्रमाणपत्र यांचे वाटप करण्यात आले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड