महाराष्ट्र शासनाच्या अन्यायकारक आबकारी धोरणाच्या विरोधात परमिट बार रुमचा जाहीर निषेध
ता. प्र. दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि.१५: – महाराष्ट्र शासनाच्या अन्यायकारक अडकारी धोरणाचा व वॅट टॅक्स वाढीचा जाहीर निषेध म्हणून महाराष्ट्रात इंडियन हॉटेल्स अँड रेस्टॉरंट या आहार संघटना असोसिएशनने आज बंद पुकारला होता. त्या पार्श्वभूमीवर धर्माबाद शहरी व तालुक्यात बार अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे सर्व सदस्यांनी म्हणजेच तब्बल १२ बार बंद करून शासनाचा तीव्र निषेध केला.
शासनाने उत्पादन शुल्कात ६० टक्क्यांनी वाढ केली असून व्याट टॅक्स ५% वरून दहा टक्के पर्यंत वाढवली आहे. तसेच नूतनीकरण शुल्कात १५ टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील हॉटेल व बार व्यवसाय अडचणीत आले असून मध्यम व छोटे दर्जाचे हॉटेल्स आणि बार बंद होण्याची शक्यता जाणकाराकडून वर्तवण्यात येत आहे.
या शासनाच्या अन्यायकारक धोरणाच्या विरोधात इंडियन हॉटेल्स अँड रेस्टॉरंट या आहार संघटनेने दिनांक १४ जुलै रोजी राज्यव्यापी बंदची घोषणा केली असून त्यांच्या समर्थनात आज धर्माबाद शहर व ग्रामीण भागातील सर्व बार बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी धर्माबाद च्या उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी ज्येष्ठ बारचालक सुरेश पाटील, बार असोसिएशनचे अध्यक्ष रमेश आण्णा गौड, संघटनेचे सदस्य दत्ता गौड, संतोष रेड्डी, माधव पाटील सोनटक्के, विवेक हंपोले, अनुप रेड्डी यांच्यासह सर्व बार अँड रेस्टॉरंटचे चालक-मालक उपस्थित होते.
चौकट–
महाराष्ट्र शासनाच्या अन्यायकारक अबकारी धोरणाचा व व्याट टॅक्स वाढीचा निर्णय हा सर्व बार अँड रेस्टॉरंट मालकावर अन्याय करणारा असून याबाबतीत इंडियन हॉटेल्स अँड रेस्टॉरंट या आहार संघटनेच्या माध्यमातून न्यायालयात आम्ही दाद मागणार असून त्या पार्श्वभूमीवर आज उपरोक्त महाराष्ट्र व्यापी निषेध आंदोलनात धर्माबाद तालुक्यातील सर्व बार अँड रेस्टॉरंट सहभागी झाले ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे बार असोसिएशनचे अध्यक्ष रमेश आण्णा गौड यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले.