नांदेड दि.७ जून:  जिल्ह्यामध्ये दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी तसेच गोरगरीब सामान्य जनतेच्या अडीअडचणी शासन दरबारी पाठपुरावा करून न्याय मिळवून देऊन त्याची सोडवणूक करून निस्वार्थपणे सामाजिक कार्य करणारे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांना नुकताच एका संघटनेच्या वतीने समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला असून हा पुरस्कार एका भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
राहुल साळवे यांनी विद्यार्थी जीवनापासून अन्यायाविरोधात बंड पुकारत विद्यार्थ्यांना न्याय हक्क मिळवून देण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील अनेक नागरिकांना छात्र भारती विद्यार्थी संघटना,भिमशक्ती संघटना, रिपब्लिकन पार्टी, प्रहार संघटना अशा विविध सामाजिक संघटनांमध्ये महत्वाच्या पदावर भुमिका बजाऊन सामान्य जनतेला न्याय हक्क मिळवून देण्याचे काम केले आहे. अनेक सामाजिक उपक्रम हाती घेऊन समाजाला एकप्रकारे दिशा देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून त्यांनी केले आहे तसेच अंध.अपंग.बहिरे-मुके, निराधार अशा अंधांना डोळे,मुक्यांना वाचा व अपंगांना आधार देऊन समाजामध्ये जगण्याचे बळ देऊन शासनाच्या विविध योजना आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्या दारापर्यंत पोहचविल्या आहेत. स्वत:वर अनेक गुन्हे घेऊन समाजाचे काम नेटाने केले आहे. या चळवळीत तीन वेळेस त्यांच्यावर जीवघेणा हल्ला हि झाला होता त्या तीन्ही हल्ल्यातून सुखरूप बाहेर येत पुन्हा समाजाचे काम नेटाने केले आहे. कोरोना महामारीच्या काळात नांदेड शहरातील दिव्यांगांना महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने सहा महिने घरपोच जेवणाची व्यवस्था केली त्यानंतर वाढता संसर्ग पाहता लाॅकडाऊन संपेपर्यंत मनपा हद्दीतील दिव्यांगांना महापालिका प्रशासनाकडून दरमहा १ हजार रुपये राशनसाठी उपलब्ध करून दिले आहेत याचीच दखल घेऊन प्रज्ञा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष किरण सदावर्ते यांनी एका बैठकीमध्ये हा पुरस्कार जाहिर केला असुन लवकरच पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांना त्यांनी दिली आहे.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
 
			














 
 
 
 
 
