हिमायतनगर प्रतिनिधी | शहरासह तालुक्यातील बांधकाम कामगारांना संसार ( Himayatnagar )उपयोगी भांड्याची किट व सुरक्षा साहित्य किटचे वाटप मेळावा हिमायतनगर शहरातील राऊत शाळेवर हदगाव हिमायतनगर (Hadgaon Himayatnagar ) तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहळीकरांच्या (Baburao Kadam Kohalikar) प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम घेण्यात आला आहे हा मेळावा तीन दिवस चालणार असून आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते दि 5 मे रोजी उपस्थित लाभार्थ्यांना भांडी व सुरक्षा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले
या शिबिरामध्ये हदगाव हिमायतनगर ,किनवट माहूर या तालुक्यातील बांधकाम कामगारांनी भाग घेतला व बांधकाम साहित्य मिळण्या करिता ऑनलाइन अर्ज करून महाराष्ट्र शासनातर्फे 100% अनुदानावर घेण्यात येणारे संसार उपयोगी भांडे व सुरक्षा किट वितरित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता याप्रसंगी उपस्थित लाभार्थ्यांना आमदार बाबुराव कदम यांनी मार्गदर्शन करून शासकीय योजनांपासून कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही ह्यासाठी मी येणाऱ्या काळात प्रयत्न करणार आहे असे सांगितले उपस्थित बांधकाम कामगारांच्या भोजनाची व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यातर्फे करण्यात आली होती.
यावेळी हा बांधकाम कामगारांच्या साहित्य वाटपाचे शिबिर 5-6-7 मे या तीन दिवसात हिमायतनगर शहरातील पळसपुर रोडवरील राऊत शाळेवर पार पडणार आहे त्यासाठी शिवशंकर कल्याणकर यांनी हिमायतनगर येथे मुक्कामी राहून सर्व गरजू लाभार्थ्यांना ह्या योजनेचा लाभ मिळून दिला त्याबद्दल त्यांचे बांधकाम कामगारांकडून कौतुक केल्या जात आहे