नांदेड दि.४ संष्टेबर :
जिल्ह्यामध्ये विविध प्रकारच्या निवडणुका घेतल्या जात आहेत त्यामध्ये दिव्यांग शाळेतील कर्मचारी अधिकारी यांना निवडणुकीचे काम दिले जात आहे त्यामुळे दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिव्यांग कर्मचारी अधिकारी यांना राज्य शासनाने निवडणुकीची कामे देऊ नये अशी मागणी सकल दिव्यांग संघटना तथा बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये दिव्यांग कर्मचारी अधिकारी यांना निवडणूक विभागाच्या वतीने विविध प्रकारची निवडणूकीची कामे दिली जातात त्यामुळे अनेक कर्मचारी अधिकारी हे निवडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त राहतात त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणात गदा येत आहे. शासनाने दिव्यांग शाळेतील शिक्षक, कर्मचारी व अधिकाऱ्यांना निवडणुकीची कोणतीही कामे देऊ नये त्यांना दिव्यांग शाळेवरच ठेवावे या मागणीचे निवेदन सकल दिव्यांग संघटना तथा बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्राच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी यांना देऊन केली आहे. या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे. प्रसिद्धी प्रमुख तथा ज्येष्ठ पत्रकार गंगाधर गच्चे यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!