नांदेड: भारतीय जनता पार्टी, नांदेड जिल्हाध्यक्ष तथा सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ संतुकराव हंबर्डे यांचा वाढदिवस रक्तदान शिबीर, रुग्णांना फळवाटप, रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन, शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप, मतिमंद विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आदि उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. सकाळी १०.३० वाजता डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी विष्णुपुरी येथिल भगवान श्री काळेश्वराचे दर्शन घेतले व आरती केली, सकाळी ११.०० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रुग्णांना त्यांच्या हस्ते फळवाटप करण्यात आले, दुपारी १२ वाजता सहयोग सेवाभावी संस्थेच्या इंदिरा इंटरनशनल स्कूल च्या आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी इंदिरा कॉलेज ओफ फार्मसी च्या यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. यासाठी कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य विश्वनाथ गायकवाड इंदिरा इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचे प्राचार्य विक्रम ठेवणे अशोक मेटकर व संच यांनी विशेष परिश्रम घेतले. यानंतर सहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरचे उद्घाटन दुपारी १२.३० वाजता आमदार डॉ तुषार राठोड यांनी केले, रक्त संकलनासाठी नांदेड शहरातील जिजाई रक्तपेढी, गोळवलकर गुरुजी रक्तपेढी यांचे संच उपस्थित होते. यावेळी सहयोग सेवाभावी संस्थेच्या कर्मचारी विद्यार्थी यांच्यासह सुमारे 182 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. यानंतर दुपारी ०१.०० पासून भारतीय जनता पार्टी नांदेड च्या कार्यकर्त्या चे स्वागत संयोग कॅम्पस येथे स्वीकारले. सायंकाळी ०७.३० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी येथील रुग्णांच्या नातेवाईकांना डॉ संतुकराव हंबर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त भोजन देण्यात आले. रक्तदान शिबिरासह देगलूर येथे शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप व मतिमंद शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले दिवसभरातील सर्व उपक्रमांच्या यशस्वितेसाठी प्राचार्य व्ही.बी. भरकड, प्राचार्य विक्रम ढोणे, प्राचार्य ईशान अग्रवाल, टीसीएस आयान डिजिटल झोनचे संचालक शिवानंद बारसे, प्राचार्य सुनील हंबर्डे, प्राचार्य एस.बी.पांचाळ, प्राचार्य डॉक्टर गजाला खान याचेसह सहयोग सेवाभावी संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, मराठवाडा संघटन मंत्री संजयभाऊ कोडगे, आमदार डॉ. तुषार जी राठोड, प्रदेश सचिव देविदासजी राठोड, चैतन्य बापू देशमुख,खुशाल पाटील उमरदरीकर, गंगाधरजी जोशी, लक्ष्मणराव ठक्करवाड डॉ. माधव पाटील उच्चेकर, प्रवीण पाटील चिखलीकर, माणिकरावजी लोहगावे, मोहनसिंग तौर, अभीषेक सोदे, गजानन जोशी, दिलीपसिंग सोडी, विजयजी गंभीरे, शितल खांडील, बालाजी बच्चेवार, श्रावण पाटील भिलवंडे, मीलींद देशमुख, बालासाहेब देशमुख, विनायकराव तरोडेकर, व्यंकटराव पाटील चांडोळकर, दीपक कोठारी, किशनदादा गायकवाड, बालाजीराव पाटील शिंदे, बालाजी पाटील पुणेगावकर, अजय बिसेन, बाळू खोमणे, संजय पाटील घोगरे, माधवराव शिंदे, दिलीप ठाकूर, दीपक ठाकूर , अनिलसिंह हजारी, शिवराम लुटे, धनराज शिरोळे, शंकरराव मनाळकर, राजेश केंद्रे, बालाजी पाटील शेळगावकर, हिरामण देशमुख, संदीप कराळे, बजरंग ठाकूर, विठ्ठल पाटील मोरे, माधवराव पाटील सांगवीकर, सदाशिवराव आबुरे, बालाजी पाटील, सुनील पाटील काळे, दत्ता पाटील धुमाळ, गजानन पाटील लोंढे, चंद्रशेखर पाटील सावळीकर, अनिल पाटील खानापूरकर, बालाजी पाटील सकनूरकर, ज्ञानेश्वर पाटील सावंत, विश्वंभर पाटील शिंदे, प्रशांत दासरवार, हनमंन नरोटे, गंगाधर कावडे, नागनाथ पाटील मचनूरकर, संजय पाटील भोसले, बालाजी पाटील सूर्यवंशी, संतोष वर्मा, प्रवीण साले, आत्माराम सुगावे, भगवान राठोड, किशनराव डफडे, सोपान मोरे, अशोक मोरे, संजय मोरे, जयप्रकाश पाटील येवले संदीप कराळे, अनिल पाटील बोरगावकर, गणेश पाटील शिंदे, देविदास सरोदे , प्रताप सिंग खालसा, मोहन जोगदंड, सुनील राणे, आनंदा पावडे, कामाजी पाटील कदम, संदीप पाटील कराळे संदीप, पावडे व्यंकटराव पाटील चांडोळकर ,माजी आमदार ओप्रकाश पोकर्णा , आरपिआय चे प्रदेश संघटक विजय दादा सोनवणे,जिल्हा अध्यक्ष मिलिंद शिराढोनकर,प्रतीक सोनवणे ,सचिन सांगवीकर, रामा चींतोरे , प्रशांत कांबळे,शुभम गाजभारे,मराठवाडा नेता संपादक रामेश्वर बद्दर, गंगाधरराव जोशी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी नांदेड शहर व जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यापारी, उद्योजक, विविध समाजसेवी संस्था संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार बांधव तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, संघ परिवाराचे पदाधिकारी यांनी डॉ. संतुकराव हंबर्डे यांचे अभिष्टचिंतन केले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड