कंधार-लोहा विधानसभा भाजप संघटनात्मक बैठकीत प्रचंड उत्साह
नांदेड २ नोव्हेंबर- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षासाठी पोषक वातावरण असून या निवडणुकीला संपूर्ण ताकदीनीशी सामोरे जायचे आहे, कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे,असे आवाहन भाजपा नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे यांनी केले आहे.
लोहा-कंधार विधानसभेतील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका व पदवीधर नोंदणी विशयक महत्वपूर्ण बैठक भाजपा मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे व जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत 1 नोव्हेंबर रोजी कंधार फार्मसी कॉलेज, बाळांतवाडी येथे संपन्न झाली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी मार्गदर्शन केले. युतीची चिंता न करता कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज रहावे, युतीबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेईल, असेही डॉ.हंबर्डे यांनी सांगितले.
यावेळी निवडणुकीची पुर्वतयारी, आढावा तसेच नियोजन या संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीस जिल्हा सरचिटणीस डॉ माधवराव पाटील उचेकर, माणिकराव लोहगावे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ सुनील धोंडगे, जिल्हा सचिव शरद मुंडे, निरंजन पाटील कौडगावकर, तालुकाध्यक्ष लोहा शहर गजानन सुर्यवंशी, लोहा उत्तर शरद पाटील पवार, लोहा दक्षिण चंद्रशेन पाटील सुरनर, कंधार शहर अध्यक्ष गंगाप्रसाद येन्नावर, कंधार उत्तर तालुका अध्यक्ष बालाजीराव पांडागळ,े कंधार दक्षिण तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील धोंडगे, माजी जिल्हा सरचिटणीस सौ. चित्ररेखाताई गोरे,संजय पाटील घोगरे, माजी जिल्हा परिषद सदस्या देविदासजी गीते, सदाशिव आबुरे, व्यकंट गव्हाणे, उत्तम चव्हाण, सदिंप मोरे,राजु पाटील येवले, भास्कर पाटील ढगे, विश्वंभर पाटील पवळे, प्रभाकर पाटील शिंदे,प्रकाश पाटील दळवे, शिवशाम देशमुख, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी व शक्ति केंद्रप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!












