
हिमायतनगर प्रतिनिधी /- भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास व उद्योजकता केंद्राचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांच्या हस्ते दि 1 फेबुवारी रोजी उद्घाटन झाले. या कार्यक्रमास राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. भारतरत्न नानाजी देशमुख कौशल विकास केंद्राला शुभेच्छा देतानाच आपल्या २०१७ मधील हिंगोली भेटीला उजाळा दिला व मराठवाड्यातील हिंगोलीत कौशल विकासाचे केंद्र असावे असा मानस त्यावेळी व्यक्त केला होता. एकप्रकारे त्यावेळी पाहिलेले स्वप्न हे आज श्रीकांत पाटील यांच्यामुळे पूर्णत्वास गेले आहे. मध्य प्रदेशात डॉ. श्रीकांत पाटील यांनी केलेल्या रोजगार निर्मिती उपक्रमाचेही याप्रसंगी त्यांनी कौतुक केले. नानाजींची जन्मभूमी ते कर्मभूमी असा प्रवास हिंगोलीचे भूमिपुत्र श्रीकांत पाटील यांनी केला आहे, व ही निश्चित अभिमानाची बाब असून, आगामी काळात हिंगोली भेटीत निश्चित या केंद्रास भेट देणार, अशी ग्वाही देत डॉ. श्रीकांत पाटील यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देखील उपमुख्यमंत्र्यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रचलित शिक्षण पद्धतीतून तरुणांच्या रोजगारभिमुख शिक्षणाचे उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आत्मनिर्भर भारत योजनेत तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी देण्याचे कार्य श्रीकांत पाटील यांनी 11 देशात व भारतातील 13 राज्यात करीत आहेत त्यांचाच प्रकल्प महाराष्ट्रात राबवला जात असून तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्धीचे कार्य केले जात आहे. मध्य प्रदेशात क्रिस्प अंतर्गत लाखो नोकऱ्या व तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचे कार्य पाटील यांनी केले आता तेच कार्य हिंगोलीत करण्यास डॉ. श्रीकांत पाटील हे कार्यरत झाले आहेत. तसेच आत्मनिर्भर भारत योजनेचे पायलट श्रीकांत पाटील ठरतील असा विश्वासही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेशातून व्यक्त केल्या..

या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला उपस्थित असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी म्हणाले की राष्ट्रऋषी भारतरत्न नानाजी देशमुख यांनी शिक्षण,आरोग्य, रोजगार,स्वयंरोजगार आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या जन्मभूमीत नानाजींचे स्वप्न साकारण्यासाठी क्रिस्प संस्थेच्या माध्यमाने श्रीकांत पाटील प्रयत्न करीत आहेत असे प्रतिपादन करत तरुणांनी या रोजगार उपलब्धीचा लाभ घेऊन आपले उज्वल भवितव्य घडवावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी हिंगोली येथील भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास व उद्योजकता केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी हॉटेल मधुरदीप सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते पुढे बोलताना भैय्याजी जोशी म्हणाले की मध्यप्रदेशात श्रीकांत पाटील यांनी त्यांच्या क्रिस्प संस्थेच्या माध्यमाने आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून भरीव कार्य केले. त्यामुळेच ह्या संस्थेला अकरा देशात व तेरा राज्यात विस्तार करता आला. दोन वर्षात एक लाखापेक्षा जास्त तरुणांना विविध क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून दिला. मध्यप्रदेशातील कार्य नानाजींच्या जन्मभूमीत करण्यासाठी श्रीकांत पाटील हिंगोलीत आपल्या जन्मभूमीमध्ये दाखल झाले असून देवेंद्रजी फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार क्षेत्रात श्रीकांत पाटील यांच्या माध्यमाने भरीव कार्य करून हिंगोली जिल्ह्याचा ना उद्योग जिल्ह्याचा ठसा पुसून टाकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तरुणांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी प्लेसमेंटच्या माध्यमाने देण्याचे काम केले जाईल परंतु तरुणांनी देखील आपले प्रामाणिकपणा दाखवून प्रशिक्षण घ्यावे असे आवाहन त्यांनी केले त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील या कौशल्य विकास उद्योजकता केंद्राच्या माध्यमाने हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्यमित्र जोशी यांनी तर आभार अमोल वैद्य यांनी मानले…
चौकट
⬛श्रीकांत पाटील जन्मभूमीचे ऋण अदा करतील-बावनकुळे

हिंगोली जिल्ह्यातील शेवाळा येथील भूमिपुत्र श्रीकांत पाटील यांनी मध्यप्रदेशात क्रिस्प या या संस्थेचे माध्यमाने रोजगार उपलब्ध चे काम केले. यानंतर हेच काम क्रिस्प संस्थेने 11 देशात व भारतातील 13 राज्यात यशाचा ठसा उमटवला व यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला डॉ. श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रिस्प साकार करत आहे. आता नानाजी देशमुख यांच्या जन्मभूमीत यांच्या कार्याचा वारसा म्हणून आपल्या हिंगोली जिल्ह्याचे भूमिपुत्र डॉ. श्रीकांत पाटील हे कार्य करत आहेत.श्रीकांत पाटील यांच्या कौशल्य विकास उपक्रमाचे केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केले कौतुक