नांदेड दि.८: दिनांक 28/12/2023 रोजी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने यातील तक्रारदार नामे राजीव मिरजकर वय 59 वर्षे यांचे मोबाईलचा रिमोट अॅक्सेस घेवून त्यांचे इंटरनेटबँकीग मार्फत 50,000 /- रू ऑनलाईन ट्रान्जेक्शन करून घेतले होते. तक्रारदार यांचे मोबाईलवर 50,000/- डेबीट झाल्याचा एसएमएस येताच सदरचे ट्रान्जेक्शन आपण केले नसल्याचे त्यांना लक्षात आले व कुणीतरी आपली फसवणुक केल्याचे त्यांना समजले. त्यामूळे त्यांनी तात्काळ सायबर पोलीस स्टेशन नांदेड येथे धाव घेतली. सायबर पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अमंलदार यांनी लगेच तक्रारदार यांची तक्रार 1930 या सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवर रजिस्टर करून घेतली व सदरची तक्रार N.C.C.R.P पोर्टलव्दारे स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी संबंधीत बँकेचे नोडल अधिकारी यांना पाठवली. तसेच तक्रारदार यांना पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे तक्रार देण्याचे कळविले त्यानंतर तक्रारदाराचे 50,000/- रू होल्ड
झाले. तक्रारदार यांना त्यांचे मोबाइलवर 50,000/- रू होल्ड झाल्याचा मॅसेज आल्यानंतर तक्रारदार यांनी त्यांचे पैसे परत मिळण्यासाठी मा. न्याय दंडाधिकारी कोर्ट 07 वे यांचे न्यायालयामध्ये सदर होल्ड झालेली रक्कम परत मिळवण्यासाठी विंनती अर्ज सादर केला. त्यानूसार मा. न्यायलयाने पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण व अर्जदाराची बँक व अर्जदाराची फसवणुक झालेली रक्कम गेलेली बँक यांचेशी खात्री करून तक्रारदार यांचे 50,000/- परत करण्याचे संबंधित बँकेला आदेश दिले. त्यानुसार तक्रारदार यांना त्यांचे ऑनलाईन फसवणुक झालेले 50,000/- त्यांचे बँक खात्यात परत मिळाले.सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक नांदेड श्री अबिनाश कुमार, पो.नि जगदिश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स्टे सायबरचे पोउपनि दळवी, पो.कॉ 1435 काशिनाथ कारखेडे, पो.स्टे नांदेड ग्रामीणचे पो.हे.कॉ. 173 मारोती माने, पो. कॉ. 1684 सचिन गरड यांनी पार पाडली. मा. न्यायालयाचे आदेशाने अर्जदाराचे पैसे परत मिळाले ही नांदेड जिल्हयातील पहिलीच घटना असल्याने सदर कामगिरी बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांनी सर्व पोलीस अधिकारी व अमंलदाराचे अभिनंदन केले आहे.
मा. पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांनी आवाहन केले आहे की आपल्या सोबत ऑनलाईन फसवणुक झाल्यास तात्काळ 1930 या सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवर कॉल करून आपले सोबत फ्रॉड झाल्याची सविस्तर माहिती देण्यात यावी. किंवा cybercrime.gov.in या वेबसाईटवर जावून आपले सायबर क्राईम फ्रॉडची तक्रार करावी. त्यानंतर सायबर पोलीस स्टेशन नांदेड व आपले जवळचे पोलीस स्टेशनला जावून तक्रार दाखल करावी. आपण तात्काळ तक्रार दाखल केल्यास आपले पैसे परत मिळू शकतात.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड