गजानन राऊत
बुलढाणा दि.१७ मार्च: दुपारी साडेतीनच्या सुमारास मध्यवर्ती भागात घटना अग्निशमन दलाने अग्नीवर मिळवले नियंत्रण चिखली शहरातील मध्यवर्ती भागात आज दिनांक १५ मार्च २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारात लागलेल्या भीषण आगीत सहा ते सात दुकाने जळून खाक झाली आहे या आगीत लघुउद्योजकांचे अंदाजे ६० ते ७० लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून मिळालेल्या माहितीनुसार आग अचानक लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आगीने अल्पावधीतच शेजारील दुकानांनाही वेडा दिला या आगीत दोन कृषी केंद्र एक वडापाव सेंटर दोन भेळ गाडी सेंटर एक घड्याळ दुरुस्ती सेंटर तसेच फळ फ्रुट सेंटर आधी दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली दुकानात तील सर्व साहित्य आगीत भस्मसात झाले या घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व आज आटोक्यात आणली सुदैवाने या घटनेत कोणतेही जीवित हानी झाली नाही मात्र व्यापाऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे दरम्यान या ठिकाणी चिखली पोलीस स्टेशन तहसील कार्यालय स्थानिक नेत्यांनी धाव घेत मदतकार्य केले या आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी मागणी परिसरात नागरिकाकडून करण्यात येत आहे आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर चे काही क्षण चित्रीकरण व व्हिडिओ चिखलीकर यांनी कॅमेरात केत केलेले भाविक चित्रण












