Free Online Courses in India: भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया उपक्रमांतर्गत 10 मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यामाध्यमातून तुम्हाला इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट, डिझाइन, फायनान्स, डिजिटल मार्केटिंग आणि पर्सनालिटी डेव्हलपमेंट यासारख्या क्षेत्रातील कौशल्य वाढवण्याची संधी आहे. हे अभ्यासक्रम आयआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थांनी डिझाइन केले आहेत. हे कोर्स पूर्ण करून तुम्ही तज्ञ बनाल सोबतच भरपूर पैसे देखील कमवू शकता.
डिजिटल मार्केटिंगमध्ये प्रभुत्व(Digital Marketing)
अॅडव्हान्स्ड अॅज अ डिजिटल मार्केटिंग स्पेशालिस्ट कोर्स एसइओ, अॅनालिटिक्स आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजीजवर लक्ष केंद्रित करतो. हे शिकून तुम्हाला डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळते. ऑनलाइन व्यवसाय वाढवण्यासाठी हा कोर्स आवश्यक आहे.
डिझाइन थिंकिंग(Design Thinking)
आयआयटी कानपूर द्वारे ‘डिझाईन थिंकिंग अँड पीपल सेंटर्ड डिझाईन’ हा अभ्यासक्रम शिकवला जातो. विद्यार्थी आणि प्रोफेशनल्सना यूजर-केंद्रित डिझाइनची कला शिकवली जाते. तुम्ही क्रिएटीव्हिटीच्या सहाय्याने समस्या सोडवायला शिकू शकता.
डिजिटल ट्रासफॉर्मेशन
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इन प्रॅक्टिस कोर्समध्ये नेतृत्व, तंत्रज्ञान कौशल्ये आणि आभासी सहयोग साधने शिकवली जातात. याद्वारे तुम्हाला कामाच्या ठिकाणी कम्युनिकेशन आणि उत्पादकता सुधारण्यास मदत करते. डिजिटल युगात हा अभ्यासक्रम तुमच्या करिअरला नवीन उंचीवर नेऊ शकतो.
कंझुमर बिहेवियर
आयआयटी खरगपूर येथील कंझुमर बिहेवियर अभ्यासक्रम शिकून तुम्हाला ग्राहकांचे मानसिक आणि सामाजिक वर्तन समजून घेण्यास मदत होईल. मार्केटिंग आणि व्यवसाय धोरणे तयार करण्यासाठी हे उपयुक्त आहे. ग्राहकांच्या निर्णयांवर प्रभाव पाडण्याची कला यामध्ये शिकवली जाते.
मंदीमध्ये नोकरीच्या स्ट्रॅटर्जी
मंदीच्या काळात नोकरी शोधणे किंवा आव्हानात्मक असते. पण मंदीच्या काळात नोकरी शोधण्याचे धोरण या अभ्यासक्रमाद्वारे शिकवले जाते. आर्थिक आव्हानांना तोंड देताना रिकव्हरी प्लान कसा तयार करावा? हे या अभ्यासक्रमातून तुम्हाला शिकता येते.
मॅनेजरियल अकाऊंटिंग
आयआयटी मुंबई येथील मॅनेजरियल अकाउंटिंग कोर्समधून तुम्हाला मॅनेजरियल अकाऊंट, फायनान्स आणि अकाउंटिंगचे व्यावहारिक उपाय शिकवले जातात. व्यवसायात योग्य निर्णय घेण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. त्यात वास्तविक जीवनातील समस्या सोडवण्याची कला तुम्हाला शिकता येते.
डेटा विश्लेषक
डेटा विश्लेषक बनण्याच्या अभ्यासक्रमात डेटाचे विश्लेषण करणे आणि त्यातून धोरणे तयार करण्याचे कौशल्य शिकवले जाते. हे आजच्या काळातील सर्वात आव्हानात्मक करिअरपैकी एक आहे. डेटा अॅनालिटिक्सच्या जगात प्रवेश करण्यासाठी हा कोर्स उत्कृष्ट आहे.
आर्थिक आणि व्यवस्थापकीय कौशल्य
आयआयटी मुंबई द्वारे मास्टर्स फायनान्शियल अॅनालिस्ट स्किल्स आणि मॅनेजरियल इकॉनॉमिक्स कोर्सेस शिकवले जातात. या अभ्यासक्रमात तुम्हाला अर्थशास्त्र, आर्थिक नियोजन आणि व्यवसायिक निर्णय घेण्यामध्ये तज्ञ बनवतात. रिसर्चसंबधी समस्या सोडवताना या कोर्सची तुम्हाला मदत होईल.
सॉफ्ट स्किल्स आणि व्यक्तिमत्व विकास
आयआयटी कानपूरचा डेव्हलपिंग सॉफ्ट स्किल्स अँड पर्सनॅलिटी कोर्समध्ये परस्पर संवाद आणि एकूण व्यक्तिमत्व विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आलंय. यातून तुम्हाला आत्मविश्वास आणि नेतृत्व कौशल्य विकसित होण्यास मदत होईल. या कोर्समुळे तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात एक नवीन वळण मिळणार आहे.
			












